pahalgam attack

जम्मू-कश्मीर /पगलगाम : 22 एप्रिल 2025 

जम्मू कश्मीरमधील पहलगाम याठिकाणी मंगळवारी (22 एप्रिल ) सकाळी दहशतवाद्यांनी क्रुर हल्ला केला. या हल्ल्यात एकुण २७ पर्यटक ठार झाल्याचे समजते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव विचारून, त्यांचा धर्म जाणून घेऊन मग ठार केल्याचे समजते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने गृहमंत्री अमित शहा यांना पहलगामला जाण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान स्वतः यावेळी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. 

सध्या कश्मिरमध्ये ट्युलिप गार्डनचा सिझन सुरू आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नाचा सिझन असल्याने कश्मिरला फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी होती.  या हल्ल्यात देशभरातील विविध राज्यातून आलेले पर्यटक बळी पडले आहेत. 

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचे दृश्य बघून अनेकांचे म्हणणे आहे, की हा हल्ला म्हणजे मुंबईतीस 26/11 त्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. या हल्ल्यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे याची अद्याप कोणाही जबाबदारी घेतलेली नाही.  मुंबईत झालेल्या हल्ल्याच्यावेळीही दहशतवादी अतिरेक्यांचे नाव, धर्म विचारत होते आणि मग त्यांना मारत होते. पहलगाम येथेही हाच पॅटर्न दहशतवाद्यांनी वापरल्याचे दिसते. 

पुढील महिन्यात हिंदूंसाठी पवित्र आणि महत्त्वाची ठरणारी अमरनाथ यात्रा आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. जेणेकरून पर्यकांमध्ये दहशत निर्माण होईल. देशात या हल्ल्याच्या विरोधात संतापाची आणि शोकाची लाट उसळली आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!