ST Bus Ticket Rate : ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेत, सर्वसामान्य प्रवाशांना धक्का दिला आहे. शहरात नोकरी-धंद्यानिमित्ताने रहाणाऱ्यांना आता दिवाळीत गावी जाताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.
मुंबई : 30/09/2025
सध्या नवरात्र सूरू आहेत आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे. असा सणासुदीचा काळ असताना सामान्य नागरिकांना आणखी एका महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. गावातून नोकरी-धंदा करण्यासाठी अनेकजण शहरात रहातात. मात्र मोठ्या सण-उत्सवांना ते आपल्या गावी जातात. यंदा मात्र त्यांना या प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे ( ST Bus Ticket Rate ) लागणार आहे. अशा काळात एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एसटीने प्रवास करणे महाग होणार आहे.
एसटी महामंडळाचा काय आहे निर्णय (ST Bus Ticket Rate)
एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भाडेवाढ येत्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळासाठी लागू असणार आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्वच बस साठी लागू नाही. शिवनेरी आणि शिवाई बस सोडून इतर बससाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात प्रवास करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
Leave a Reply