Ladakh Violence : लेह लडाखमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचूक यांनी अटक केली गेली आहे. जाणून घ्या तेथील परिस्थिती.
लेह : 26/09/2025
सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षक सोनम वांगचुक यांना लेह मधून पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) कायदा अंतर्गत अटक (Sonam Wangchuk Arrested) केली आहे. त्यांच्यावर हिंसा पसरवण्याचे आरोप लावण्यात आले आहे. वांगचुक हे अनेक दिवसांपासून लडाख च्या विशेष दर्जासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी आंदोलन करत आहे.
सोनम वांगचूक यांना अटक करण्याच्या एक दिवस आधी, केंद्र सरकारने सोनम वांगचूक यांच्या गैर-लाभकारी संस्था स्टुडंटस एज्युकेशन एंड़ कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख (SECMOL) चे एफसीआरए (FCRA) चे विदेशी फंडीग लायसन्स रद्द करण्यात आले आहे. याबाबत वांगचूक यांनी सरकारला इशार दिला होता. लडाख येथे झालेल्या हिंसाचारात अत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 90 जण जखमी झाले आहेत.
वांगचूक यांचे उपोषण का होते सुरू ? (Sonam Wangchuk Arrested)
वांगचुक यांनी लेह एपेक्स बॉडी (ABL) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलांयस (KDA) यांच्या सोबत मिळून लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा आणि भारतीय संविधान च्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण त्यांनी 10 सप्टेंबर 2025 सुरू केले होते. हे उपोषण 15 दिवस सूरू होते. जेव्हा लडाख मध्ये हिंसाचारास सुरूवात झाली, तेव्हा हे उपोषण समाप्त करण्यात आले. वांगचूक यांच्यावर नागरिकांना भडकवण्याचा आरोप लावण्यात आला.
उपराज्यपालांनी बोलवली बैठक (Sonam Wangchuk Arrested)
वांगचुक यांच्या अटकेपूर्वी लेह-लडाख चे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी एक उच्चय स्तरीय मीटिंग बोलावली होती. केंद्र सरकारने येथे झालेल्या हिंसेंबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्रालाद्वारे सांगितले आहे की, 10 सप्टेंबर पासून सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केले होते. त्यांनी लडाख ला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे. केंद्र सरकार याविषयी ABL आणि KDA सह याविषयी चर्चा करत आहे.
Climate activist Sonam Wangchuk arrested by Ladakh police team led by DGP S D Singh Jamwal: Officials. pic.twitter.com/muxsxhSa5U
— Press Trust of India (@PTI_News) September 26, 2025
Leave a Reply