जम्मू-कश्मीर : 2025-05-09
पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात आंध्र प्रदेशचे वीर जवान मुरली नायक (23) (Murali Nayak Shahid ) शहीद झाले आहेत. सीमारेषेवर आपल्या कर्तव्यावर असताना त्यांनी शौर्याने लढा दिला. मात्र त्यांना वीरमरण आले. मुरली नाईक यांच्या शहीद होण्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण देशावरच शोककळा पसरली आहे.
ऑपरेशन सिंदूर मोहिमेनंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या श्री सत्य जिल्ह्याचे सुपुत्र मुरली नायक हे पाकिस्तानच्या गोळाबारात शहीद झाले आहेत. त्यांनी त्यांच्या कर्तव्यावर असताना पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या या कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याविषयीचे कौतुक आणि दुःख असे दुहेरी वातावरण आहे. कश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानने अचानक गोळीबार सुरू केला होता. यात काही नागरिकांचाही मृत्यू झाला. यातच मुरली नायक यांना वीरमरण आले.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांच्यासह अनेक राजकिय नेत्यांनी नायक यांना श्रद्धांजली वाहीली. शहीद नायक यांचे पार्थिव शरीर त्यांच्या गावी उद्या पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Leave a Reply