Palakhi Sohala

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी दरम्यान पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. 

महाराष्ट्र : 2025-06-16

जून महिना आला की समस्त  वारकरी संप्रदायाला ओढ लागते ती पंढरपूरची. दरवर्षी सर्व वारकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे लक्ष असते ते संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi )आणि देहू येथील संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palakhi ) यांच्या पालखी प्रस्थानाचे. यावर्षी या पालख्या 19 जूनला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. लाखो वारकरी या भक्तीपूर्ण सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोली, एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. 

एआय तंत्रज्ञानाधारित मार्ग व्यवस्थापन  

पुणे पोलिसांकडून एआयच तंत्रज्ञानाधारित मार्ग व्यवस्थापनाची सोय विश्रांतवाडी, संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवे घाट या प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 

या काळात बस मार्ग बदलणार 

श्री संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palakhi ) आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ) सोहळा 20 जून आणि 21 जून रोजी पुण्यात मुक्कामासाठी आहे. 22 जून रोजी पहाटे हडपसरमार्गे सासवडला आणि लोणी काळभोरला मुक्कामी पोहोचेल. त्यामुळे या मार्गावरील बस मार्गात बदस केला आहे. पुण्याहून सासवडला पालखी सोहळा जाताना प्रवासी भाविकांसाठी 60 जादा बसचे नियोजन केले आहे. 22 जून रोजी दोन्ही पालख्या दुपारी 12 ते 1 दरम्यान हडपसर येथे थांबतात. त्यामुळे महात्मा गांधी स्थानकातून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बस व्यवस्था केली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बस उपलब्ध होईल. 

आषाढीसाठी 80 विशेष रेल्वे 

आषाढी वारीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने नागपूर, कोल्हापूर, अमरावती, खामगाव येथून 80 आषाढी विशेष रेल्वे धावणार आहेत. 

पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्याच्या 16 फेऱ्या होणार आहे. ट्रेन क्रमांक 01207 ही गाडी 3 ते 10 जुलैपर्यंत पुणे येथून सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि मिरज येथे त्यात दिवशी सायंकाळी पावणेसात वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01208 ही विशेष गाडी मिरज ते पुणे धावणार यामध्ये पंढरपूर थांबा असणार आहे. रेल्वेत 12 सामान्य द्वितीय श्रेणी/ शयनयान श्रेणीचे कोच असेल. तसेच नागपूर-मिरज,नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर यांच्या प्रत्येकी चार फेऱ्या असणार. लातूर-पंढरपूर (10 फेऱ्या) ,मिरज -कलबुर्गी (20 फेऱ्या ) आणि कोल्हापूर -कुर्दुवाडी (20 फेऱ्या ) अशा गाड्या धावणार आहे. 

बोपदेव घाटमार्गे बस 

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हडपसरमार्गे दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी जातो. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक असतात. त्यामुळे दिवेघाट रस्ता वाहतुकीस पूर्णतः बंद असतो. या मार्गावरील बस वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असे. बस दिवेघाटएवजी बोपदेव घाटमार्गे सुरु राहिल. बस स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर अशा असणार आहे. त्यासाठी 60 जादा बसचे नियोजन केले आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!