Sansad Ratna Award 2025

संसदेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खासदारांना ( संसदपटूंना ) भारतीय लोकशाहीमध्ये संसद रत्न पुरस्कार ९ (Sansad Ratna Award 2025 ) दिला जातो. 2025 मधील हे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी 17 उत्कृष्ठ संसद सभासदांची निवड करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : 2025-05-18

लोकशाही व्यवस्थेमध्ये जे खासदार संसदेत उत्कृष्ट आणि लोकहितार्थ काम करतात, त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते.यावर्षी देशातील 17 खासदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी  संसदरत्न पुरस्कार मिळवण्यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, मेधा कुलकर्णी, अरविंद सातव, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड या 7 खासदारांना संसदरत्न पुरस्काराने (Sansad Ratna Award 2025 ) सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांनी संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. 

प्राईम पॉईंट फाउंडेशनच्यावतीने हे पुरस्कार दिले जातात.  संसदेत प्रश्न विचारून, चर्चेत सहभाग घेऊन, प्रश्नांचा पाठपुरवठा करणाऱ्या, कामात योगदान आणि सहकार्य करणाऱ्या अशा काही मूल्यांकनावरून निवड करण्यात येते. यावर्षीच्या या पुरस्काराची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. 

महाराष्ट्रातील संसदरत्न पुरस्काराचे मानकरी 

  • सुप्रिया सुळे ( राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार गट ) 
  • श्रीरंग बारणे – (शिवसेना -शिंदे गट ) 
  • अरविंद सावंत ( शिवसेना- उद्धव ठाकरे गट ) 
  • नरेश म्हस्के ( शिवसेना शिंदे गट ः 
  • स्मिता वाघ  ( भाजप ) 
  • मेधा कुलकर्णी ( भाजप ) 
  • वर्षा गायकवाड ( कॉंग्रेस ) 

इतर राज्यातील संसदरत्न पुरस्काराचे मानकरी 

  • प्रवीण पटेल ( भाजप ) 
  • रवि किशन ( भाजप ) 
  • निशिकांत दुबे ( भाजप ) 
  • विद्युत बरण मेहता (भाजप ) 
  • पी.पी. चौधरी (भाजप ) 
  • मदन राठौर (भाजप ) 
  • सी.एन. अन्नादुरई  ( द्रविड मुनेत्र कळघम ) 
  • दिलीप सैकिया ( भाजप ) 

या खासदारांचा संसदरत्न पुरस्कारार्थींच्या यादीत  समावेश आहे. 

याशिवाय वित्त समितीचे अध्यक्ष भर्तुहरि महताब, कृषी समितीचे अध्यक्ष कॉंग्रेसचे चरणजीत सिंह चिन्नी या विभागीय संदर्भ असणाऱ्या समित्यांच्या आधारे निवडण्यात आलेल्या या सभासदांचा ही समावेश आहे. 

 या सतरा संसदरत्न पुरस्कारार्थींपैकी भर्तुहरी महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे या चार जणांना 16 व्या आणि 17 व्या लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे खासदार ठरलेले आहेत. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!