Sameer Wankhede Vs Aryan Khan : आर्यन खानची ‘बॅडस ऑफ बॉलिवूड’ ही वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजविरोधात समीर वानखेडेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना त्यातून कोणताही दिलासा मिळाला नाही. काय म्हणाले कोर्ट जाणून घ्या.
दिल्ली : 26/09/2025
बॉलिवडच्या बादशहा शाहरूख खान याचा लेक आर्यन खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतीच त्याची ‘बॅडस् ऑफ बॉलिवूड’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. त्याने या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने पहिल्या दिवसापासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील काही दृश्यांवर सोशलमीडियावर काही मिम्स व्हायरल झाले आहेत. यातील एक पात्र अधिकारी समिर वानखेडेंसारखे दाखवण्यात आले आहे. ती पाहून वानखेडेंनी (Sameer Wankhede Vs Aryan Khan) दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांनी रेड चिली प्रॉडक्शन हाऊसवर मानहानीचा दावा केला आहे. आता या प्रकरणावर कोर्टाने आपले म्हणणे मांडले आहे.
काय म्हणाले कोर्ट ? (Sameer Wankhede Vs Aryan Khan)
कोर्टाने समीर वानखेडेंचा हा दावा फेटाळला आहे आणि योग्य ती दुरुस्ती याचिकेत करून या रजिस्ट्री तुम्हाला तारीख देईल. आम्ही निश्चित तारीख देणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या सुनावणीची निश्चित तारीख देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला आहे.
कसा झाला युक्तीवाद ? (Sameer Wankhede Vs Aryan Khan)
शाहरूख खानच्या रेड चिलीस एन्टरटेंन्टमेंचतर्फे ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांच्यावर जबाबदारी होती. नेटफ्लिक्सतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना नेमण्यात आले होते. तर समीर वानखेडे यांच्या बाजूने वकील संदीप सेठी यांनी युक्तीवाद केला. वानखेडे यांनी याचिकेत म्हटल्याप्रमाणे ही वेबसीरिज दिल्लीसह वेगवेगळ्या परिसरात प्रदर्शित होत असून सर्वाधिक मानहानी दिल्लीत झाल्याचा दावा आहे. दिल्लीत वेगवेगळ्या प्रकार्चे मीम्स व्हायरल देखील झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी (Sameer Wankhede Vs Aryan Khan)
आर्यन खानच्या ‘बॅडस् ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखी हुबेहुब दिसणारा एक अभिनेता आहे. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रुझवरून आर्यन खानला ड्रग्जप्रकरणात अटक केली होती. जवळपास एक महिना आर्यन खान तुरूंगात होता. त्यानंतर त्याला क्लिन चीट देण्यात आली होती. आता आर्यन खान याना त्याच्या वेब सीरिजमध्ये वानखेडेंची हुबेहुब नक्कल करणारे पात्र दाखवले आहे. त्यामुळे वानखेडेंनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी आपली खिल्ली उडवली गेल्याचे म्हटले आहे. मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयाने त्यांची निराशा झाली आहे.
Leave a Reply