Rupali Thombre On Ashok Kharat case" त्या पुरावेही नष्ट करू शकतात", Ashok Kharat केसमध्ये चाकणकरांवर ठोंबरेंचे आरोप.

Rupali Thombre On Ashok Kharat case: भोंदूगिरीच्या आड महिलांचे शोषण कऱणाऱ्या नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिष ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या अटकेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक : 19-03-2026 

नाशिक मधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरात (Rupali Thombre On Ashok Kharat case) याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे अभय होते का ? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्या पदावर राहिल्या तर त्या पुरावेही नष्ट करू शकतात, असा आरोप करीत, ‘जनाची नाही तर मनाची लाज असेल तर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’ अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

महिला आयोगाकडे वर्षभरापूर्वी खरात विरोधात तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, त्याची चौकशी तेव्हाच केली असती तर आता पीडित महिलांची संख्या वाढली नसती, असा दावा पाटील -ठोंबरे यांनी केलाय नाशिकमधील स्थानिक पत्रकारांनी या प्रकरणाला एका वर्षापूर्वी वाचा फोडली होती, अशी माहिती देत पाटील म्हणाल्या, वाचा फोडणाऱ्या पत्रकाराकडेच चाकणकर यांनी खुलासा मागितला होता व जबरदस्तीने माफीनामा घेतला होता. संस्थेची चौकशी करणे गरजेचे होते, पण तसं झालं नाही.

ठोंबरे म्हणाल्या …(Rupali Thombre On Ashok Kharat case)

कारण खरातच्या ट्रस्टवर स्वतः रुपाली चाकणकर आहेत. जर तो माफीनामा घेतला नसता, तर आत्ताच्या पीडित महिला वाचल्या असत्या, असा दावाही त्यांनी केला. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षच ट्रस्टवर असल्याने अशोक खरात या नराधमाची हिंमत वाढली. रुपाली चाकणकर या खरातचे पाय धुतानाचे, त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशी कृती करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

रुपाली चाकणकर यांनी खरातला एक प्रकारे अभय दिले आहे का ?, की वाटेल त्या महिलेचे शोषण कर. हव्या त्या महिलेचा बलात्कार कर. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यांच्या कृतीतून असेच दिसते. वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे प्रकरणात राज्य महिला आयोगावर असून रुपाली चाकणकर महिलांबाबत अन्यायकारक बोलल्या. खरं तर ते कायद्याने चूक आहे. जनाची नाही मनाची लाज सोडलेल्या लोकांनी आपल्या पदावरून पायउतार व्हायला पाहिजे, ‘ असे देखील रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

रुपाली चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी (Rupali Thombre On Ashok Kharat case)

भोंदूगिरीच्या आड महिलांचे शोषण कऱणाऱ्या नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिष ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या अटकेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खरातकडून जप्त केलेल्या 58 आक्षेपार्ह व्हिडिओमुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आणि प्रतिष्ठित 5 व्यक्तींचे धाबे दणाणले असून, याप्रकणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!