Rupali Chakankars Tweetरुपाली चाकणकरांचं पहिलं ट्विट समोर; पोलीस महासंचालकांना दिले दोन पानी पत्र.

Rupali Chakankars Tweet : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर राज्यात गदारोळ निर्माण झाला आहे. एकामागेएक अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात आलेल्या राज्य हिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे ट्विट समोर येत आहे.

मुंबई : 20-03-2026 

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Rupali Chakankars Tweet) याच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत अनेक हदरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या भोंदू अशोख खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहे. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे या भोंदू बाबासोबतचे काही फोटो समोर आले आहेत. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच, अखेर चाकणकरांनी ट्वीट करत आपली बाजू मांडल्याचे समोर येत आहे.

रुपाली चाकणकरांनी घेतली महासंचालकांची भेट  ( Rupali Chakankars Tweet )

‘आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकऱणातील सत्यता बाहेर यावी व आरोपींवर कारवाई होण्याकरीता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.’ असं चाकणकर यांनी आपल्या या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान आपल्या या ट्विटसोबत त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिलेलं एक दोन  पानांच पत्र देखील जोडलं आहे. या पत्रामध्ये चाकणकर यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी- आरोपीचे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी असलेले संबंध पहाता, तपासावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन स्थापित व विशेष तपास पथक एसआयटी ने निपक्षपातीपणा तपास करावा.

कारवाईची प्रक्रिया ( Rupali Chakankars Tweet)

पीडिताचे संरक्षण – सापडलेल्या 58 व्हिडिओमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेण्यात यावे आणि त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.

कठोर कायदेशीर कारवाई – आरोपीने जर डिजिटल पुरावे (व्हिडिओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील तर त्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत वाढीव कलमे लावून कडक कारवाई करण्यात यावी.

कालबद्ध तपास – सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे, पीडित महिलांना न्याय मिळेल.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाता प्रगती अहवाल वेळोेवेळी सादर करण्यास पोलीस आयुक्त नाशिक यांना कळवावे ही विनंती असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!