• Home
  • महाराष्ट्र
  • RSS Dussehra Melava 2025 : संघ स्थापनेची शताब्दी, कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर; दसरा मेळाव्याला होणार मोठी घोषणा !
RSS Dussehra Melava

RSS Dussehra Melava 2025 : संघ स्थापनेची शताब्दी, कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर; दसरा मेळाव्याला होणार मोठी घोषणा !

RSS Dussehra Melava : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष उत्सव नागपुरातील विजयादशमी मेळाव्यापासून सुरू होत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थित हा मेळावा होणार आहे.

नागपुर : 22/09/2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा (RSS Dussehra Melava)विशेष असणार आहे. नागपुरात विजयादशमीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी हे पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहे. तसेच या कार्यक्रमावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

यावर्षीच्या विजयादशमीपासून ते 2026 च्या विजयादशमीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. या काळात देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरमध्ये डॉ. हेडगेवार यांच्या घरी 17 जणांच्या उपस्थितीत झाली होती. 17 एप्रिल 1926 रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे निश्चित करण्यात आले. 1926 या वर्षी पहिल्या विजयादशमी उत्सवात संघाचे पहिले पथसंचलन झाले होते.

या वर्षीच्या कार्यक्रमाची रूपरेषा  (RSS Dussehra Melava)

यावर्षी 27 सप्टेंबर रोजी नागपूरात तीन ठिकाणांहून संघाचे पथसंचलन निघणार आहे. हे तिन्ही पथसंचलन सकाळी 7:45 वाजता व्हेरायटी चौकात एकत्र येतील. जिथे सरसंघचालक त्यांचे अवलोकन करतील. पथसंचलनानंतर योग प्रात्यक्षिकेही सादर केले जातील. या कार्यक्रमासाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या कार्यक्रमात बजाज समूहाचे संजीव बजाज यांच्यासह घाना, इंडोनेशिया, थायलंड आणि अमेरिकेसह विविध देशांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत.

शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशभरात अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरात घरा घरात जाऊन गृहसंपर्क अभियान चालवले जाईल. राज्यात ठिकठिकाणाहून हिंदू संमेलने, युवा संमेलने आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. बंगळूर, कोलकाता आणि मुंबईमध्ये सरसंघचालकांचे विशेष संवाद कार्यक्रम होणार आहेत. सध्या देशभरात 83 हजारपेक्षा जास्त दैनिक शाखा आणि 32 हजारापेक्षा जास्त साप्ताहिक सुरू आहेत, अशी माहिती सुनील आंबेकर यांनी दिली.

प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांची उपस्थिती (RSS Dussehra Melava)

संधाचे काम गेली 100 वर्ष सुरू आहे. समाजाला एकाच रूपात पाहणे, सामाजिक समरसता आणि स्वावलंबन यावर संघाचा विशेष भर आहे. या 100 वर्षात संघाची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे समाजाने संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होणे. समाजाच्या प्रगतीसाठी संघाचे स्वयंसेवक अविरतपणे काम करत आहेत.
ऑक्टोबरमध्ये जबलपूर येथे संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. विजयादशमीच्या (RSS Dussehra Melava)  कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन संघाची गीतं गाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून संघ आपली 100 वर्षांची वाटचाल आणि भविष्यकाळातील योजना समाजासमोर मांडणार आहे असेही सुनील आंबेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Releated Posts

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building In Pimple Saudagar

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At pune Airport Due To Leopard

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या…

ByByJyoti Bhalerao Nov 27, 2025