Rohit Shetty Firing Caseरोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरींग प्रकरणात मोठी कारवाई, हरियाणातून 9 आरोपींना अटक.

Rohit Shetty Firing Case : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरींग प्रकरणात हरियाणातून मुख्य शूटरसह आणखी काहीजणांना अटक करण्यात आली. आतापर्यंत 9 आरोपी ताब्यात  असून मास्टरमाईंड अद्याप फरार आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

मुंबई : 16-02-2026 

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty Firing Case) जुहू येथील घराबाहेर 1 फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. आता या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. पोलिसांनी हरियाणा येथून शुटर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी एकूण 9 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या विशेष कार्य दल (एसटीएफ) सोबत मिळून केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत… (Rohit Shetty Firing Case)

ऋतिक यादव (रा.बहाबिजौली, आग्रा), दिपक (रा.सेक्टर, 45, सदरपूप,नोएडा), सनी (रा. बहाबिजौली, आग्रा) आणि सोनू ( रा.बहाबिजौली, आग्रा) अशी हरयाणातून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींपैकी एक मुख्य शुटर आहे, तर इतर त्याचे साथीदार असल्याते सांगितले जात आहे.

पोलिसांनी यापूर्वी 5 आरोपींना पुणे आणि आसपासच्या भागातून आरोपींना अटक केली होती. आरोपींमध्ये आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी, स्वप्नील सकट आणि आसाराम फसाळे उर्फ बाबू (शस्र पुरवठादार)  अशी आहे. यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मास्टरमाईंड फरार (Rohit Shetty Firing Case)

या संपूर्ण घटनेचा सूत्रधार शुभम लोणकर असल्याचे सांगितले जात आहे. हा तरूण अजूनही फरार आहे. त्याचा संबंध कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी असू शकतो असे तपासात समोर आले आहे. पोलीस या शुभम लोणकर याचा तपास घेत आहे. आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लवकरच फरार मास्टरमाईंडलाही पकडले जाईल आणि संपूर्ण नेटवर्क उघड केले जाईल.

स्कूटरमुळे उघडले गुपित (Rohit Shetty Firing Case)

मुंबई पोलिसांना शेट्टी टॉवरपासून सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरावर विर्ले पार्ले पश्चिमेकडील एका हॉटेलजवळ पार्क केलेली एक सोडून दिलेली स्कूटर सापडली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, स्कूटरवरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बोटांचे ठसे, डीएनए नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तपासादरम्यान, सेकंड-हँड होंडा स्कूटर पुण्यातील कर्वे नगर येथील रहिवासी अमन मारोटे यांच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले.

ही स्कूटर 19 वर्षीय आदित्य गायकी याने खरेदी केली होती. जो पूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आहे. ही खरेदी जानेवारीत अंदाजे 30,000 रुपयांना करण्यात आली होती. पोलीस तपासात या स्कूटरची खरेदी शुभम लोणकर सांगण्यावरून स्वप्नील सकटने पैसे पुरवल्याचे समोर आले. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!