Rob Jetten Netherlands : नेदरलँडसच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला गेला आहे. नेदरलँडचे नवे पंतप्रधान म्हणून रॉब जेटन यांची निवड करण्यात आली असून ते सर्वात तरूण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान ठरले आहेत.
ॲमस्टरडॅम : 24-02-2026
नेदरलँडसच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला गेला आहे. 38 वर्षीय रॉब जेटन (Rob Jetten Netherlands) हे नेदरलँडसचे सर्वात तरूण आणि पहिे समलैंगिक पंतप्रधान बनले आहेत. सोमवारी द हेग येथील हुईस टेन बॉश पॅलेसमध्ये राजा विल्यम-अलेक्झांडर यांनी त्यांना पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
ऑक्टोबर 2025 मध्ये नेदरलँडसमध्ये चुरशीची निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत मुख्य लढत ही डेमोक्रँटस 66 पक्षातून जेटन आणि इस्लामविरोधी गटातून नेते गीर्ट विल्डर्स यांच्या झाली. या निवडणुकीतील विजयानंतर जेटर यांनी पीपल्स पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रॅसी आणि ख्रिश्चन डेमोक्रॅटीक अलायन्ससोबत मिळून अल्पमतातील सरकार स्थापन केले आहेत.
जेटन हे नेदरलँडसचे पहिले समलैंगिक पंतप्रधान ठरले असून सरकार आता नवे कायदे अंमलात आणण्यासाठी विरोधी पक्षांचा सामना करावा लागणार आहे. जेटन यांनी देशात सामाजिक समावेश आणि नवीन धोरणांवर आधारित सरकार स्थापन कऱण्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा (Rob Jetten Netherlands)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (24 फेब्रुवारी 2026) रॉब जेटन यांचे नेदरलँडसच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया प्ललफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, नेदरलँंडसच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल रॉब जेटन यांचे अभिनंदन. भारत आणि नेदरलँडसचे संबंध विविध क्षेत्रांवर आधारित असून या संबंधांना गती देण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सूक आहे.
Congratulations Mr. Rob Jetten on assuming office of the Prime Minister of the Netherlands. India and the Netherlands share an extensive relationship across diverse sectors. I look forward to working closely with you to add further momentum to the growing ties between our two…
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2026
रॉब जेटन यांची ओळख (Rob Jetten Netherlands)
रॉब जेटन नेदरलँडसचे सर्वात तरूण आणि समलैंगिक पंतप्रधान ठरले आहेत. ऑक्टोबर 2025 च्या चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सध्या त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेतय त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात डेमोक्रेटस 66 च्या युवापक्षातून केली होती. 2017 मध्ये ते पहिल्यांदा संसदेत निवडून आले. त्यांनी अवघ्या काही वर्षातच पक्षाचे संसदीय नेते म्हणून आपली ओळख निर्माण केलीय जेटन हे उदारमतवादी आणि प्रगतशील विचारांचा नेते मानले जातात. शिक्षण, पर्यावरण, संरक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर त्यांचा विशेष भर आहे.