Raj Thackeary

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी लादण्याचा निर्णयावर कडाडून निषेध व्यक्त केला आहे. फडणवीस सरकारने जीआर रद्द केल्यानंतरही, त्यांनी डॉ. नरेंद्र जाधव समितीबाबत चिंता व्.क्त केली. मराठी भाषेच्या अस्मिकेचा मुद्दा अधोरेखित करत, त्यांनी जनतेच्या विरोधाचा उल्लेख केला आणि जाधव समिकीकडून मराठी भाषेला न्याय मिळेल याची खात्री करण्याची मागणी केली. त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील इतर समस्यांबद्दल चर्चा केली. 

मुंबई : 30/06/2025

पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत की अजून कोणीही… आम्ही खपवून घेणार नाही. मराठी भाषेला जनतेचा विरोध आहे. हे त्यांनी समजून घ्यावं अशा स्पष्ट शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला. आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. मराठी भाषा संपली ना तर ती परत येणार नाही, भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर काही अर्थ नाही, असंही राज ठाकरेेंनी नमूद केलं. 

सरकारने जीआर घेतला मागे 

महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णयाला राज्यभरातून कडाडून विरोध झाल्यानंतर अखेर फडणवीस सरकारने यासंबंधीचे दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण जनविरोध , विरोधी पक्षांकडून मिळालेला आंदोलनाचा इशारा आणि मराठी अस्मितेचा मुद्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे हिंदी सक्तीला विरोध दर्शवणाऱ्या सर्वच पक्षांनी जल्लोष केला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने तर याविरोधात प्रामुख्याने भूमिका घेत 5 जूलैला मोर्चाची हाकही दिली होती. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याची घोषणा  केली तसेच त्रिभाषा धोरणाबाबत पुढील पाऊल तज्ञ समितीच्या अहवालानंतर ठरवले जाईल असे स्पष्ट केले. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती स्थापन करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ट्विट करत या निर्णयावर प्रतिक्रीया दिली होती. 

जीआर रद्द झाल्यावर मराठी भाषेचा, अस्मितेचा विजय झाल्याते सांगत त्या आनंदात मनसेतर्फे जल्लोष करण्यात आला. या आनंदात सहभागी झालेल्या राज ठाकरे यांचे औक्षण करण्यात आले, अभिनंदनही करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा भूमिका स्पष्ट केली. हिंदी सक्तीच्या मुद्दावरून सडेतोड भूमिका मांडतानाच त्यांनी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीबाबतही प्रतिक्रीया दिली. 

राज ठाकरे कडाडले …

पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत की अजून कोणीही.. महाराष्ट्रामध्ये (या निर्णयाला ) मराठी माणसांनी ज्या प्रकारे विरोध केलेला आहे, त्याची जाणीव जाधवांना असेल. आम्ही खपवून घेणार नाही. मराठी भाषेला जनतेचा विरोध आहे. हे त्यांनी समजून घ्यावं. महाराष्ट्रामध्ये खुप प्रश्न आहेत, भाषेवरती उगाच प्रश्न आणू नका असंही राज ठाकरे यांनी सुनावलं. 

विधानभवनात जे विरोधात बसलेले आहेत, त्यांनाही माझं हेच सांगणं आहे की आमदारांनी की सुरू असलेल्या अधिवेशनात मूलभूत प्रश्न जे आहेत, त्याबद्दल बोलावं. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत, शाळा नाहीयेत, शिक्षकांना पगार नाहीत. एकेका शिक्षकांवर वेगवेगळ्या विषयाचं ओझं टाकलं जातं, त्यांना इतर कामंही दिली जातात इतके जे विषय आहेत, त्या विषयांना हात घालावा, ते मांडा असे आवाहन राज ठाकरेंनी आमदारांना केलं. 

महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरू 

राज्याच्या बाबत उद्या मराठी माणसाच्या विरोधात मराठी भाषेच्या विरोधात कोणी असेल तर त्याला विरोध असेल, उद्धव ठाकरे यांच्या काळात उच्च शिक्षण यातला तो मुद्दा होता. त्यानंतरचा तो विषय आहे, हे कानावर आलं, असं राज ठाकरे म्हणाले. डिटेल्स आले नाहीत. ठाण्याच्या माणसाने सही केली आहे. मराठी, महाराष्ट्र,मराठी भाषा या विषयावर कोणीही कडून तडजोड होता कामा नये. सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आपण सतर्क रहावं असं मराठी माणसांना आवाहन आहे. 5 जुलै मोर्चात मी बोलेन. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!