Raghevandra Bappu Mankar,राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारत, गरजू रूग्णांसाठी महापौर निधीला जमा करणार, (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Raghevandra Bappu Mankar : पुणे महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र.25 (ब) मधून निवडून आलेले नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी एक आदर्श निर्णय जाहीर केला आहे.

पुणे : 10-02-2026

पुणे महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. 25 (ब) मधून निवडून आलेले नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर (Raghevandra Bappu Mankar) यांनी एख आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते स्विकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला असून, ही मानधनाची रक्कम ‘महापौर निधीला’ वर्ग करण्याबाबतचे पत्र देत, शहरातील गरजू रूग्णांच्या मदतीसाठी खर्च करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 19 (अ) 1 अंतर्गत निर्वाचित सभासदांना मिळणारे मानधन आपण स्वीकारणान नसल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. या मानधनाची रक्कम दरमहा ‘महापौर निधी ‘ मध्ये जमा करण्यात यावे आणि त्यातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेलेल्या गरजू रूग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.

काय म्हणाले राघवेंद्र मानकर (Raghevandra Bappu Mankar)

या निर्णयाबद्दल बोलताना राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले की, “राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. नगरसेवक पद हे या सेवेसाठी ताकद देणारे पद आहे. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचे मानधन घेणे मला पटत नाही. त्यांनी दिलेल्या या संधीच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून येणारे मानधन हे त्यांच्या सेवेसाठी खर्च व्हावे या भावनेतून मी हा निर्णय घेतला. अनेकदा गरीब रूग्णांना औषधोपचारासाठी मोठ्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो. माझ्या मानधनाचा विनियोग अशा रूग्णांच्या सेवेसाठी झाल्यास त्याचे मला अधिक समाधान मिळेल.”

सर्वाधिक मताधिक्याने विजयी आहेत मानकर (Raghevandra Bappu Mankar)

राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 25-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर हे तब्बल 26 हजार 497 मतांच्या फरकाने विजयी ठरले आहेत. भाजपाच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. प्रभाग क्रमांक 25 मधील चारही जागांवर भाजपाचे राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडीत हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याची कामगिरी राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी आपल्या पहिल्याच विजयात साध्य केली आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये झालेल्या एकुण मतदानापैकी 31 हजार 981 इतरी मते त्यांना मिळाली. तब्बल 79.34 टक्के मते राघवेंद्र बाप्पू मानकर यांना मिळीली आहेत.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!