Purandar Airport : पुरंदर तालुक्याच्या जवळ निर्माण करण्यात येणाऱ्या ” छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शेतकऱ्यांनी मंजूरी दिली आहे. त्यासाठी आपली जमीन देण्यासाठी ते तयार झाले आहेत. या निर्णयामुळे 2900 एकर जमीनीवर काम सुरू होऊ शकणार आहे.
पुणे : 20/09/2025
पुरंदर तालुक्यात निर्माण करण्यात येणाऱ्या छत्रपति संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Purandar Airport) आवश्यक असणाऱ्या एकुण 3 हजार एकर जमिनीपैकी 90% जमिन देण्यासाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यासह सुमारे 2700 एकर जमिनीच्या अधिग्रहणाचा मार्ग खुला झाला आहे.
याठिकाणी शासनाच्या मालकीची 200 एकर जमिनसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे एकुण 2900 एकर जमिन विमानतळासाठी उपलब्ध होणार आहे. पुरंदर विमानतळासाठी मुंजवडी, खानवडी, उदाटीवाडी आणि वनपुरी या गावांतील जमिन मिळवण्यात येणार आहे. या विमानतळासाठी एकुण साडे सात हजार एकर जागेची गरज शासनाकडून सांगण्यात आली होती. मात्र ही जागा देण्यासाठी गावकऱ्यांकडून विरोध झाला होता. तो विरोध लक्षात घेता साडे सात हजारांपेक्षा कमी जागा ताब्यात घेण्याचे शासनाने ठरवले आहे.
विमानतळामुळे रोजगाराच्या संधी (Purandar Airport)
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी येथील सात गावांमधील शेतकऱ्यांशी संपर्क साधून संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले आहे की, या योजनेचा त्यांना कसा फायदा होणार आहे, आणि ही योजना कशी अंमलात येणार आहे. त्यांनी यावेळी स्पष्ट केेले आहे की, पुरंदर विमानतळाच्या निर्मितीमुळे संपूर्ण पुरंदर तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या विकास होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला आहे की, या विमानतळाच्या निर्मितीमुळे गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचा जीवनस्तर निश्चितच उंचावणार आहे.
समन्वयक डॉ.कल्याण पांढरे, पुरंदर तालुक्याच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि भूमि अधिग्रहण अधिकारी संगिता राजापूर चौगुले यांच्या प्रयत्नांमुळे 25 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंतच्या या 24 दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडून जमिन अधिग्रहणाची संमति मिळवण्यात अधिकांशी यश मिळाले आहे. जिल्हाधिरी डुडी म्हणाले की, या विमानतळाच्या निर्माणासाठी अत्तापर्यंत 2800 शेतकऱ्यांकडून सुमारे 2700 एकर जमिन देण्याची सहमति मिळाली आहे.
Leave a Reply