Pune Rajiv Gandhi Zoological Museum : पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण असते. आता या संग्रहालयाचा कायापालट होणार आहे. तसे संकेत पुण्याचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
पुणे : 25/09/2025
पुण्यातील कात्रज येथील महानगरपालिकेचे राजीव गांधी प्राणी संग्रहालय (Pune Rajiv Gandhi Zoological Museum) शहराचे मुख्य आकर्षण आहे. हे संग्रहालय सुमारे 130 एकर मध्ये वसवलेले आहे. येथील नैसर्गिक सौंदर्यासह या संग्रहालयाला विकसित करण्यात आले आहे. येथे फार मोठा जलाशय आहे. हजारो पर्यटक येथे दरवर्षी भेट देत असतात. सुटीमध्ये येथे अनेक कुटुंब लहानमुलांना घेऊन भेट देतात. मात्र या संग्रहालयाच्या जागेच्या मानाने येथे प्राण्यांची संख्या फार कमी आहे. पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी ही बाब निर्दशनास आणून दिली आहे. आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले आहे की, या प्राणी संग्रहालयात प्राण्यांची संख्या कमी आहे. पुण्या सारक्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाते प्राणी संग्रहालय निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी येत्याकाळात पुणे महानगरपालिका विशेष प्रयत्न करणार आहे.
योजनेवर होणार काम ( Pune Rajiv Gandhi Zoological Museum )
आयुक्त नवलकिशोर राम यांनी म्हटले आहे की, प्राणी संग्राहलय आणखी अद्ययावत करण्याची योजना लवकरच अंमलता आणली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेस देण्यात आले आहे. आधुनिक सर्पोद्यान प्रकल्प त्वरीत पूर्ण करण्यात येणार आहे, आणि बर्ड पार्क प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या सर्व नविन प्रकल्पांमुळे येथे भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढून, मनपाच्या निधीत वाढ होणार आहे.
आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले आहे की, एकुण 66 प्राणी संग्रहालयांचा विकास करणे ही मनपाची प्राथमिकता असणार आहे. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता होणार नाही, येथील जागेचा आणि नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करून कात्रज संग्रहालयाला देशातील नामांकित संग्रहालयात रूपांतर केले जाणार आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता ( Pune Rajiv Gandhi Zoological Museum )
या संग्रहालयाचा विस्तार फार मोठा आहे. मात्र येथे कर्मचाऱ्यांची संख्या त्यामानाने बरीच कमी आहे. याबाबतही मनपा प्रशासन विचार करेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. येथे विविध प्रजातींचे प्राणीही आणले जाणार आहेत. त्यांच्यासाठी योग्य अधिवास आणि सुविधा निर्माण केल्या जातील. त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश विभागाला दिला आहेत. यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आयक्त नवल किशोर राम यांनी म्हटले आहे की, पुण्यातील प्राणी संग्रहालय हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नसून येथे लहान मुलांचे शिक्षण होते, त्यांच्यात पर्यावरण जागरूकता आणली जाते. शहराची सांस्कृतिर ओळख म्हणून हे संग्रहालय आहे. यासाठी येथील सुविधा आणि प्राण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. प्रशासनाचा हाच प्रयत्न असेल की, येथे जास्तीत जास्त प्राणी आणले जातील आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जातील.
Leave a Reply