Pune Porsche Car Accident

Pune Porsche Car Accident   : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने पोलिसांची महत्त्वाची मागणी फेटाळून लावली आहे. न्याय मंडळाच्या या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

पुणे : 15/07/2025

सुमारे  एक वर्षानंतर पुण्यातील पोर्शे कार अपघात( Pune Porsche Car Accident )प्रकरणात काही हलचाल सुरू झाली आहे. तब्बल वर्षभरानंतर या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मे 2024 मध्ये झालेल्या या कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली आहे. आरोपी विरोधात प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी केली होती. त्याला न्याय मंडळाने नकार दिला आहे. या मुलाविरोधात अल्पवयीन म्हणूनच हे प्रकरण चालवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

19 मे 2024 रोजी रात्री पुण्यात हा अपघात घडला होता. पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरात धडक दिली होती. याच दुचाकीवरील आयटी इंजिनियर तरूण आणि तरूणीचा मृत्यू झाला होता. अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्टा असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

बाल न्याय मंडळ ( JJB) कडे पुणे पोलिसांनी अर्ज केला होता. दोन जणांचा मृत्यू झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील 17 वर्षीय मुलाविरोधात प्रौढ म्हणून खटला चालवण्यात यावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती. 

सुप्रिम कोर्टाचा दाखला देत मागणी फेटाळली  (pune Porsche Car Accident )

पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलासंदर्भात पुणे पोलिसांनी जी मागणी केली होती, ती बाल न्याय मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत फेटाळली. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अल्पवयीन मुलाचे कृत्य बाल न्याय कायद्यातील क्रूर गुन्ह्यात मोडत नाही, असे बाल न्याय मंडळाने म्हटले आहे. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयाला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. न्याय मंडळाने मागणी फेटाळली असून, सविस्तर आदेश अजून मिळालेला नाही, असे पोलीस अधिकार्याने सांगितले. 

काय आहे पोर्शे कार प्रकरण ?  (pune Porsche Car Accident )

पुण्याच्या कल्याणी नगर भागात 19 मे 2024 ला नशेमध्ये गाडी चालवणाऱ्या पोर्शे गाडीने एका दुचाकीला धडक मारली होती. दुचाकीवरील अवधिया आणि कोस्टा यांचा या धडकेत मृत्यू झाला होता. घटनेच्या काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले होते.मात्र काही तासातच बाल न्याय मंडळा ( जेजेबी) चे सदस्य एल.एन.दानवडे यांनी त्याला जामीन मंजूर केला. या केसमधील सर्वात संतापजनक घटना होती, ती अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा रस्ता सुरक्षेविषयक निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन, जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र लोकांच्या संतापाचा आणि विरोध लक्षात घेऊन, जामीन देण्याच्या निर्णयावर पुर्नविचार करून, अल्पवयिन आरोपीला सुधारगृहात पाठवण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबई उच्च न्यायालयाने सोडून देण्याचे आदेश दिले. 

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा ‘विशाल अग्रवाल’ मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली, त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात अल्याचा प्रकार घडला. अनेक पुरावेही नष्ट करण्यात आले होते. त्यासाठी पुण्यातील काही राजकीय नेत्यांनीही मदत केल्याचे दिसून आले होते.  अशा परिस्थितीत हे प्रकरण आणखी कोणते वळण घेते, हे जनसामान्यांसाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!