Pune Metro security : पुणे मेट्रोच्या व्यवस्थापनाने आता प्रवाश्यांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी जाणून घेऊ.
पुणे : 06/10/2025
पुणे मेट्रोच्या व्यवस्थापनाकडून आता प्रवाश्यांच्या सुरक्षिततेत (Pune Metro security) आता आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी आता रामवाडी ते वनाज आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी सुरक्षा गस्त सुरू करण्यात आला आहे. यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षिततेत आणि प्रवास सुलभ होण्यास मदत होणार आहे.
सुरक्षा गस्तीमध्ये संबंधित मेट्रो स्टेशनवर सुरक्षा पर्यवेक्षक आणि कर्मचारी यांचे पथक पुणे ट्रेन आणि स्टेशन परिसरात दिवसभरात नियमित स्वरूपात पाच ते सहा वेळा गस्त घालणार आहेत. या गस्तींचा उपयोग ट्रेन मध्ये शिस्त रहावी यासाठी होणार आहे. तसेच गैरव्यवहार थांबवण्यासाठीही होणार आहे. प्रवासी ट्रेनमध्ये दुर्वव्यवहार जर होत असेल, घाण पसरवली जात असेल किंवा ट्रेन मध्ये जेवण करणे, ट्रेन व्यवस्थापनाच्या नियमांविरोधात जर काही होत असेल, तर अशा गोष्टींवर लक्ष ठेवून, कारवाई केली जाणार आहे.
गस्त घालणारे सुरक्षा कर्मचारी (Pune Metro security)
सर्व सुरक्षा कर्मचारी निर्धारित गणवेश घालून असणार आहेत.सर्व ठिकाणी सतर्कतेने लक्ष ठेवले जाणार आहे. जर मेट्रे कोणता प्रवासी नियमांचे उल्लंघन करत असेल, तर मेट्रे व्यवस्थापनाच्या कायद्याप्रमाणे दंड ठोठावण्यात येणार आहे. जर घटना फार गंभीर असेल तर, संबंधित प्रवाश्याला संबंधित पोलिस स्टेशनला पाठवण्यात येणार आहे.
मेट्रो व्यवस्थापन (Pune Metro security)
पुणे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे की, या विशेष सुरक्षा अभियानामुळे शिस्त वाढणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या मनात सुरक्षिततेविषयीची भावना वाढीस लागणार आहे. मेट्रे प्रवासादरम्यान प्रवाश्यांना चोरी, छेडछाड किंवा इतर घटना यांची भिती रहाणार नाही. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला होणार आहे.
Leave a Reply