Pune Metro Train Project : शहरातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या पुणे मेट्रोला आता आणखी गती मिळणार आहे. महामेट्रो (Maha Metro ) ने स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा विस्तार आणखी जलदगतीने करण्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीशी करार केला आहे.
पुणे : 22/09/2025
पुणे मेट्रो रेल्वे (Pune Metro ) प्रकल्पाला आता आणखी गती मिळणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Mahametro) ने स्वारगेट ते कात्रजपर्यंतच्या नियोजित भुयारी मार्गासाठी आता एका खाजगी कंपनीची निवड केली आहे. महामेट्रोने ITD सीमेंटंशन इंडिया लिमिटेड कंपनीला या भुयारी मार्गासाठी काम दिले आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे काम आता ही कंपनी करणार आहे.
या मार्गाचा एकुण खर्च 1,643,88 करोड रूपये इतका असणार आहे. या निर्णयामुळे आता या मार्गाच्या कामाला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग योजना ( Pune Metro )
स्वारगेट ते कात्रज पर्यंतचा हा मेट्रोचा भुयारी मार्ग ‘पर्पल लाईन’ च्या अंतर्गत P1A-UGC(R) निर्माण करण्यात येणार आहे. या मार्गाची एकुण लांबी सुमारे 5.46 किलोमीटर इतकी असणार आहे. हा मार्ग भुयारी असणार आहे. या संपूर्ण मार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत 5 मेट्रो स्टेशन असणार आहेत. मार्केटयार्ड (गुलटेकडी), बिबवेवाडी, पद्मावती, बालाजी नगर आणि कात्रज नगर आणि कात्रज मार्ग येथे दुहेरी अंडरग्राऊंड स्टेशन असणार आहेत.
दोन स्टेशनची अधिक निर्मिती (Pune Metro)
याआधी या मार्गावर केवळ तीन स्टेशन असणार होते. मात्र नागरिक आणि लोकप्रतिनीधींच्या आग्रहास्तव आणखी दोन स्टेशनची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आणि आता तो पूर्ण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मेट्रोचा विस्तार होणार असून, नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुखकर होणार आहे. महामेट्रोने या मार्गासाठी प्रस्तावित रक्कम 2,144 करोड रुपये इतकी निश्चित केली होती. त्यासाठी कुमार इंफ्राप्रोजेक्टस, एलएंडटी, टाटा प्रोजेक्टस, अफकॉन-सैम इंडिया जेवी आणि एससीसी-कल्पतरू जेवी यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी या प्रकल्पासाठी टेंडर भरले होते. मात्र ITD सीमेटेशन चे दर निश्चित दरांपेक्षा सुमारे 24 टक्क्यांनी कमी असल्याकारणाने त्यांना हे काम देण्यात आले आहे.
42 महिन्यात होणार मार्ग निर्मिती (Pune Metro)
या मार्गाचे काम पुर्ण करण्यासाठी 42 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. जर काम वेळेत सुरू झाले तर हा मार्ग 2029 पर्यत नागरिकांसाठी खुला होऊ शकतो. प्रस्तावित योजनेनुसार 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये साईटची तयारी आणि शिफ्टिंगसारखे कामं सुरू करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या तीन महिन्यात सिव्हिल कामांची सुरूवात करण्यात येणार आहे. 2027 च्या दुसऱ्या तीमाही मध्ये भुयारी मार्गासाठीच्या टनेलिंगचे काम सुरू होऊ शकते.
स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतर पुण्यातील नागरिकांसाठी मोठी मदत होणार आहे. दैनंदिन प्रवासात जो वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो तो कमी होणार आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये या मार्गासाठी आतुरता आहे.
Leave a Reply