Pune Mayor Manjusha Nagpureपुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर, सुरक्षा व्यवस्थेवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Pune Mayor Manjusha Nagpure : महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांना आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे : 17-02-2026 

पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आयुक्त नवल किशोरराम यांना आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी नागपुरे यांनी महापालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांनी सुधारणा करण्यास सांगितले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कडक भूमिका घेतली आहे.

सोमवारी (16 फेब्रुवारी) सकाळी महापौरांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेची अचानक पाहणी केली. त्यांनी अनेक गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना फटकारले. या उणीवा दूर करण्यासाठी महापौर  नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तात्काळ बैठक बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली. त्यांच्या अनपेक्षित आगमनामुळे सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तपासणीदरम्यान मंजुषा नागपुरे यांना इमारतीतील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नसल्याते आढळून आले. हा निष्काळजीपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांना फटकारले आणि या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत असा प्रश्न केला.

काय म्हणाल्या महापौर ? (Pune Mayor Manjusha Nagpure)

सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना महापौरांना मुख्य इमारतीच्या अनेक प्रवेशद्वारांवर आणि महत्त्वाच्या कॉरिडॉरवर सुरक्षेचा अभाव असल्याचे लक्षात आले. सुरक्षेशी संबंधित त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांकडून उत्तरे मागितली. नागपुरे यांनी या उणीवा दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवण्याते निर्देशही महापालिका आयुक्तांना दिले. सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. पुणेकरांच्या सुरक्षेततेशी किंवा महानगरपालिकेच्या शिस्तीशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे नागपुरे यांनी स्पष्ट केले.

नागपुरे तिसऱ्यांदा नगरसेवकपदी  (Pune Mayor Manjusha Nagpure)

भाजपच्या मंजुषा नागपुरे या तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिक बाग येथून त्यांनी अर्ज भरला होता. त्या सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. अशातच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रभागातील तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवर म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक 34 मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखर्या जातात. महापालिकेच्या कामाचा त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!