ST Parivahan Mahamandal

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे  (ST Parivahan Mahamandal )अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या 5,150 इलेक्ट्रीक बसचा पुरवठा करणाऱ्या ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीचे टेंडर रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

मुंबई : 2025-05-27

महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या इलेकट्रॉनिक बस विषयीचा मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीशी केलेला करार रद्द केला आहे. सोमवारी एसटी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष्य आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या 5,150 इलेक्ट्रीक बस ज्या कंपनीकडून घेतल्या जात होत्या, त्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीशी केलेला करार रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कंपनी सेवा देण्याबाबत निष्क्रीय ठरल्याने हा करार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून या कंपनीशी केलेला करार रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

सदर कंपनीला 22 मे पर्यंत 1,000 बस पुरवठा करण्यासाठीचे वेळापत्रक देण्यात आले होते. परंतु वेळेत कंपनी बसचा पुरवठा करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे भविष्यात सुद्धा कंपनी सेवा देण्यात असमर्थ ठरली तर काय ? या आशंकेमुळे हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महामंडळाला जास्त संख्येने बसची आवश्यकता आहे, आणि अशा स्थितीत जर कंपनीने वेळेवर बस पुरवल्या गेल्या नाहीत तर काय ? म्हणून हा करार रद्द  केला पाहिजे असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. 

शिवशाही बस आता हिरकणी मध्ये बदला 

सरनाईक यांनी  सूचना दिल्या आहे की, सध्या एसची महामंडळाकडून चालवणाऱ्या शिवशाही बसचे रूपांतर हिरकणी बस मध्ये केले जावे. त्यासह या बस पहिल्या सारख्या हिरव्या-पांढऱ्या रंगातच असायला हव्यात.

बस स्थानकांमध्ये अस्वच्छतेचेही मोठे साम्राज्य दिसून येत आहे. प्रवासी आणि विशेषतः महिला प्रवाश्यांचा याविषयीच्या खुप तक्रारी येत असतात. या प्रवाश्यांच्या तक्रारी एकुण त्या संबंधीत अधिकाऱ्यांनी दाखल करून त्यावर कारवाई करणे अपेक्षित असते. जर अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही असेही ते झालेल्या बैठकीत म्हणाले. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!