पुणे : 2025-05-14
मध्यमवर्गीय पुणेकरांच्या दररोजच्या प्रवासाचा श्वास समजल्या जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड (पीएमपीएमएल ) च्या तिकिटांचे दर आता वाढवण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि मल्टि-मॉडल इंटिग्रेशनला प्रेत्साहन देण्यासाठी पीएमपीएमएल ने त्यांच्या भाडेदराची रचना आणि तिकिट प्रणालीमध्ये बदल करत अद्यावत म़ॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीएमपीएमएलने प्रवासाच्या अंतरानुसार 11 टप्प्यांमध्ये भाडे रचनेची नवीन व्यवस्था सुरू केली आहे. या रचनेत 30 किमी ( 5 किमी अंतराने ) पर्यंतच्या प्रवासाठी सहा टप्पे आणि 30 किमी ते 80 किमी (१० किमी अंतराने ) असे पाच टप्पे समाविष्ट करण्यात आले आहे.
वाढलेले हे तिकिटाचे दर पुढील पंधरा दिवसांनंतर लागू करण्यात येणार आहेत. पीएमपीएच्या मुख्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमएल दर वाढीनुसार प्रवासाचे टप्पे, प्रवासाचे दर आणि बस पासचे दर यांच्यातही बदल करण्यात आले आहेत. डिसेंबर 2014 मध्ये बस तिकिटांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर थेट 11 वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे.
3 ते 12 वयोगटातील मुलांसाठीचे प्रस्तावित भाडे दर
| प्रस्तावित टप्पा | प्रस्तावित अंतर (किमी) | प्रस्तावित दर रूपये |
| 1 | 1-5 | रुपये 10 |
| 2 | 5.1 – 10 | रुपये 20 |
| 3 | 20.1 – 25 | रुपये 30 |
| 4 | 15.1 – 20 | रुपये 40 |
| 5 | 20.1 – 25 | रुपये 50 |
| 6 | 25.1 – 30 | रुपये 60 |
| 7 | 30.1 -40 | रुपये 70 |
| 8 | 40.1 – 50 | रुपये 80 |
| 9 | 50.1 – 60 | रुपये 90 |
| 10 | 60.1 – 70 | रुपये 120 |
| 11 | 70.1 – 80. | रुपये 120 |
या बदलेल्या अद्यावत भाडे प्रणालीचा उद्देश पीएमपीएमलच्या व्यवस्थेच पारदर्शकता आणणे, तिकिट व्यवस्था सुलभ करणे आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सह डिजीटल तिकिट सुविधांशी सुसंगतता आणण्यासाठी होणार असल्याचे पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बस पासमध्ये करण्यात आलेले बदल :
पुणे किंवा पिंपरी चिंचवड हद्दीसाठी सध्याचा रुपये 40 चा दैनिक पास आणि रुपये 900 चा मासिक पास आता उपलब्ध नसणार.
नविन एकत्रित पास – दोन्ही शहर हद्दीतील दैनिक पास : रुपये 70
मासिक पास – रुपये 1, 500
पीएमआरडीए पासचे सुधारित दर –
दैनिक पास रुपये 120 एवजी रुपये 150 असणार आहे.
या बदललेल्या दरवाढीची झळ पुढील विशेष पास योजनांना बसणार नाही
विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरित आणि दिव्यांग पास योजना यांच्यात कुठलेही दर बदल करण्यात आलेले नाही.
पीएमपीएमएल च्या 13 मे रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हे निर्णय मंजूर करण्यात आले आहेत. या बैठकीत पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयु्क्त, प्रेदेशिक परिवहन अधिकारी (पुणे ) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी ) चे संचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पीएमपीएमएलच्या ताफ्यांचा होणार विस्तार आणि केली जाणार कर्मचारी भरती
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार आणि विकास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यानुसार वाहतूक व्यवस्थाही आणखी मजबूत असणे आवश्यक आहे. वाढत्या वाहतूक मागणीचा विचार करून पीएमआरडीएने 500 नवीन सीएनजी बस खरेदीसाठी 230 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या मालकी गुणोत्तरानुसार अतिरिक्त बसेस जोडल्या जाणार आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही सुधरावी यासाठी पीएलपीएमएल तिसऱ्या एजन्सीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
Leave a Reply