भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने “ऑपरेशन सिंदूर” खास मिशन अंतर्गत ही मोठी कारवाई पार पाडली आहे. या कारवाई अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिर मधील एकुण 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला आहे.
दिल्ली : 2025-05-07
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर या खास मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिर मधील एकुण 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करून हल्ला केला आहे. या सर्व ठिकाणच्या आतंकवाद्यांच्या ठावठिकाणांचा अचूक वेध घेत ही कारवाई करण्यात आली आहे. येथील अशी सर्वा ठिकाणे उद्धस्त करण्यात आली आहेत.
भारताच्या वायुसेने कडून करण्यात आलेल्या या इतक्या मोठ्या कारवाईला भारतीय जनमानसाचा ठाव घेणारे असेच नाव देण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर या नावाने ही कारवाई करण्यात आली आहे. जेव्हा 22 एप्रिल रोजी पहलगाममधील भारतीय हिंदू पर्यटकांवर आतंकवाद्यांनी जो हल्ला केला होता, तेव्हा पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी घातली होती. त्यांच्या या वर्तणुकीला उत्तर देण्यासाठी आणि हिंदूं स्रियांच्या सौभाग्य चिन्हाला स्मरून सरकारने या सर्जकिल स्ट्राईकला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे.
22 एप्रिल 2025 ला पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी पर्यटकांमधील पुरूषांवर अमानुष गोळीबार केला होता. त्यांना त्यांचा धर्म विचारून फक्त पुरूषांना मारून टाकण्यात आले होते. त्यांच्या या कृत्याचा धडा शिकवण्यासाठी भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर ‘ या मोहिमेअंतर्गत आतंकवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे.
पहलगामवर पर्यटकांवर हल्ला झाल्यापासून समस्त भारतवासी पाकिस्तानवर कारवाई कधी करणार याची वाट पहात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे 24 एप्रिलला झालेल्या एका कार्यक्रमात मोठी कारवाई होणार असे संकेत सुद्धा दिले होते. त्यानुसार कारवाई केली गेली आहे. ऑपरेशन सिंदूर च्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या एकुण 9 ठिकाणांवर ही कारवाई केली गेली आहे.
Leave a Reply