• Home
  • राष्ट्रीय
  • October Weather Update, 2025 : ऑक्टोबरमध्येही होणार आणखी पाऊस, शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! : Weather Update 115 Rain Alert In Whole India In October
October Weather Update

October Weather Update, 2025 : ऑक्टोबरमध्येही होणार आणखी पाऊस, शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! : Weather Update 115 Rain Alert In Whole India In October

October Weather Update : यावर्षी सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने महाराष्ट्रावा झोडपून काढले. या अतिरिक्त पावसामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. सप्टेंबरच्या शेवटी पावसाचे थैमान शमले जाईल असे वाटत असतानाच, हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने ऑक्टोबर महिन्याची चिंता वाढली आहे.

मुंबई : 30/09/2025

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबरच्या शेवटी पाऊस थांबून, नुकसान आटोक्यात येईल असे वाटत असतानाच,एक नवीन बातमी समोर येत आहे. हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये संपूर्ण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यात सामान्य पातळीपेक्षा 115 % जास्त पाऊस पडणार आहे अशी माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली आहे.

ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस  (October Weather Update)

मृत्युंजय महापात्रा यांनी ऑक्टोबर महिन्यातील पावसाच्या अंदाजाबाबत सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. आता ऑक्टोबरमध्ये गेल्या 50 वर्षांच्या सरासरीपेक्षा 115% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमधील अतिरिक्त पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता ऑक्टोबरच्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर कोणते संकट उभे रहाणार आहे, याची चिंता आहे.

ऐरवी सप्टेंबरमध्ये परत जाणारा मान्सून, यावर्षी ऑक्टोबर आला तरी सक्रीय आहे. देशाच्या काही भागात अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. आता ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके वाचलेली आहेत, त्यांना आता नवा धोका निर्माण झाला आहे.

यावर्षी इतका पाऊस का ? (October Weather Update)

दरवर्षी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातुन येणारे ओले वारे उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे जातात. जेव्हा हे वारे उत्तर भारतातली थंड वारे आणि पश्चिमेकडील विक्षोभांशी टक्कर देतात तेव्हा मुसळधार पाऊस पडतो. तसाच पाऊस आता पडत आहे. आणखी एक कारण म्हणजे जागतिक तापमानवाढीमुळे मान्सून आणि इतर हवामान प्रणाली असामान्यपणे सक्रिय होत आहे. त्यामुळे सध्या पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे.

पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता (October Weather Update)

ऑक्टोबरमध्ये भात, मका आणि सोयाबीनच्या पिकांची काढणी केली जाते. यंदा ऑक्टोबरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या पिकांच्या काढणीवर परिणाम होऊ शकतो. आणि पिकांचेही नुकसान होऊ शकते. तसेच इतर पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहरी भागातही पावसामुळे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025