S.L.BhyrappaaNovelist S.L.Bhyrappaa pa Passes Away

Novelist S.L.Bhyrappa Passes Away : पद्मभूषण आणि सरस्वती सन्मान पुरस्कार विजेते, प्रसिद्ध साहित्यिक एस.एल. भैरप्पा यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

म्हैसूर : 24/09/2025

कन्नड साहित्यातील एक महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. थोर साहित्यिक एस.एल.भैरप्पा  (Novelist S.L.Bhyrappa ) यांचे आज वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. कन्नड साहित्यातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पद्धभूषण  पुरस्काराने गौरविल होते. म्हैसुरमध्ये ते कुटुंबासोबत रहात होते. गेल्या काही काळापासून ते निवृत्त आयुष्य जगत होते. बंगळूरमधील राष्ट्रोधाना रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भैरप्पा यांच्या साहित्यकृती वाचकांमध्ये खुप प्रसिद्ध आहेत. तरूणांसह सर्वांनाच त्यांच्या लेखनीने भुरळ घातलेली आहे. त्यांच्या काही साहित्यकृतीवर चित्रपटसुद्धा निर्माण करण्यात आले. एस.एल.भैरप्पा हे कन्नडमधील एक प्रमुख कांदबरीकार, तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यांच्या कादंबऱ्या भारतातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या. त्यांना सरस्वती पुरस्कार (2010) केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (1975), पद्मभूषण (2023) यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. त्यांनी समाजोपयोगी कामांसाठी डॉ. एस.एल.भैरप्पा प्रतिष्ठानची निर्मिती केली आहे.

एस.एल.भैरप्पा यांची प्रमुख साहित्याकृती (Novelist S.L.Bhyrappa)

वंशवृक्ष, दाटू, तंतू, अंशू, पर्व, गृहभंग, सार्थ, मंद्र अशा अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांचे त्यांनी लेखन केले.

वैयक्तिक जीवन (Novelist S.L.Bhyrappa)

संतशिवर लिंगण्णय्या भैरप्पा यांचा जन्म 26 जुलै 1934 रोजी हसन जिल्ह्यातील चन्नरायपट्टण तालुक्यातील संतशिवर गावात झाला होता. ते आधुनिक कन्नड साहित्यातील प्रमुख कादंबरीकारांपैकी एक आहेत. त्यांच्या कृतींमध्ये तत्वज्ञान, सौंदर्यशास्र आणि मानवी नातेसंबंधांचा ठाव घेणारे पैलु दिसून येतात. त्यांच्यी सर्व पुस्तके सर्वात जास्त खपणारी कन्नड पुस्तके म्हणून ओळखळी जातात. हिंदी, मराठी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांची पुस्तके अनुवादीत केली गेली आहेत.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!