Nitin Gadkari On Toll : नवीन प्रणाली प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. याअंतर्गत वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही. ही प्रणाली आधीच 85 टोल नाक्यांवर लागू कऱण्यात आली आहे.
नवी दिल्ली : 08-05-2026
रस्ते वाहतूक आणि टोल (Nitin Gadkari On Toll) हे विषय नेहमी चर्चेत असतात. टोल आणि वाद हेरी समीकरण मध्यंतरी चांगलेच ऐरणीवर आले होते. आता याच टोलच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एक नवीन योजना आणत असल्याचे सांगितले. या नवीन प्रणालीत वाहनांना आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज भासणार नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की. 2026 च्या अखेरपर्यंत देशभरातील टोल प्लाझा रद्द केले जाऊ शकतात. त्यांच्या जागी एक नवीन प्रणाली आणली जाईल, ज्यामध्ये वाहने न थांबता प्रवास करू शकतील आणि कापलेल्या अंतरावर आधारित टोल आकारला जाईल. एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टटॅगवर आधारित असेल. या अंतर्गत वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही. ही प्रणाली आधीच 85 टोल नाक्यांवर लागू कऱण्यात आली असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत ती देशभरात लागू कऱण्याची योजना आहे.
टोलचा खर्च वाचणार (Nitin Gadkari On Toll)
नितीन गडकरी म्हणाले की, नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळक तंत्रज्ञान आणि फास्टटॅगवर आधारित असेल. या नवीन प्रणालीमुळे प्रवासाचा खर्च लक्षणीयरित्या कमी होईल. सध्याचा 125-150 रुपयांचा टोल सुमारे 15 रुपयांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. त्यांनी 3 हजार रुपयांच्या पासचाही उल्लेख केला. ज्यामुळे 200 टोल नाक्यांवरून प्रवास कऱणे शक्य होईल. दिल्ली-जयपूर, दिल्ली -डेहराडून, अमृतसर, काटरा आणि श्रीनगरसह अनेक महामार्ग कॉरिडॉरवर काम वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्रात हायवेचे जाळे विस्तारणार (Nitin Gadkari On Toll)
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित नवीन ‘हाय-स्पीड क़ॉरिडॉर्स’ (अतिजलद मार्गिका), ‘हाय-डेन्सिटी कॉरिडॉर्स'(अति वाहतूक घनता मार्गिका) आणि इतर महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतला. एका अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय राजधानीत आयोजित या आढावा बैठकीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी महामार्ग विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा केली. यामध्ये नागपूर-भंडारा टप्प्याचे सहा-पदरीकरण, तळोदा-बर्हाणपूर टप्प्याचे चार-पदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियल कॉरिडॉर, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) कॉरिडॉर, ग्वाल्हेर-नागपूर कॉरिडॉर आणि नागपूर-हैद्राबाद कॉरिडॉर यांचा समावेश आहे.