Navi Mumbai Airport Inagurationनवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण.

Navi Mumbai Airport Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी मेट्रोच्या अंतिम टप्प्याचेही उद्धाटन केले.

मुंबई : 08/10/2025

मुंबईमध्ये आज दुसरे विमानतळंही सुरू झाले आहे. मुंबईसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai Airport Inauguration) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. आज पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असणारी मेट्रो एक्वा-लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण (Navi Mumbai Airport Inauguration)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि मेट्रो एक्वा-लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे उद्धाटन झाले. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुमारे 19650 कोटी रूपये करून बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी हाताळू शकणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.

मेट्रो -3 आता धावणार जोमात (Navi Mumbai Airport Inauguration)

मुंबई मेट्रो लाईन-3 चा अंतिम टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला झाला आहे. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा आहे. यामुळे गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास मुंबईकरांना थेट करता येणार आहे. यापूर्वी मेट्रो -3 दोन टप्प्यांत सुरू होती. आरे ते बीकेसी (BKC) आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी सुरू होती. आज अंतिम टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. याच विज्ञान केंद्र (नेहरू सेंटर) ते कफ परेड पर्यंतच्या 11 स्थानकांचा समावेश आहे.

यावेळी पंतप्रधान आपल्या या दौऱ्यात विमानतळ, मेट्रो मार्ग यासह मुंबई वन या एका एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे आणि शॉर्ट-टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (STEP) चे देखील लोकार्पण करणार आहेत.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!