Naval Kishor Ram

गेल्या काही दिवसात राज्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याच बदल्यांच्या अंतर्गत, आता पुण्याच्या आयुक्तपदी (  Pune’s Commissioner ) नवल किशोर राम (Naval kishor Ram ) विराजमान होणार आहेत. 

पुणे : 2025-05-21

पुणे महापालिकच्या आयुक्तपदी (  Pune’s Commissioner ) पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव नवल किशोर राम (Naval kishor Ram ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे सध्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले येत्या 31 मे रोजी सेवानिवृ्त्त होत आहेत. त्यांमुळे त्यांच्या जागी पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून 31 मे ला नवल किशोर राम हे पदभार स्विकारणात आहेत. 

नवल किशोर राम यांच्याविषयी 

भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 बॅचचे नवल किशोर राम (Naval kishor Ram )  हे ( आयएएस) अधिकारी आहेत. नवल किशोर राम मूळचे बिहार चे आहेत. त्यांच पहिलं पोस्टींग हे महाराष्ट्रातच नांदेड मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर बीड, संभाजीनगर जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. संभाजीनगर मधील कचऱ्याच्या प्रश्नाने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले होते. पुण्यात या आधीही त्यांनी सेवा दिलेली आहे. कोरोना काळात ते शहराचे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यलयात उपसचिव म्हणून झाली. राज्यात पुन्हा एकदा प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे, आणि पुण्याचे विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे 31 मे ला सेवानिवृत्त होत असल्याने नवल किशोर राम  (Naval kishor Ram )आता पुण्याच्या आयुक्तपदाचा (  Pune’s Commissioner ) भार स्विकारत आहेत. 31 मेला त्यांनी पदभार स्विकारावा अशे आदेस सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!