राष्ट्रीय : 2025-05-15
गेले तीन महिने उन्हाने होरपळलेल्या लोकांना आता पावसांच्या सरींने थंडावा मिळणार आहे. देशवासीयांसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. अंदमान निकोबार बेटांवर गेल्या 24 तासांमध्ये धमाकेदार पाऊसाने हजेरी लावली आहे. बंगालचा उपसागर, उत्तर अंदमानचा समुद्र, निकोबार बेट या ठिकाणी मुसळदार पाऊस झाला आहे. पुढील चार पाच दिवसांमध्ये अरबी समुद्राचा काही भाग, मालदिव दक्षिण बंगालचा उपसागराचा काही भाग यासर्व ठिकाणी मान्सून दाखल होण्यास अनुकुल वातावरण आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन ?
राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे आणि अन्य शहरात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रातही मान्सून लवकरच येणार असल्याचे चिन्हं आहेत. 6 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे. 27 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल.
अवकाळी पावसाचे संकट
शेतकरी वर्गासह सामान्य लोक पावसाची आतूरतेने वाट पहात असताना, अनेक भागात गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विदर्भ, मराठवाडा येथे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नऊ जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. मनमाड शहर आणि परिसरातही विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस झाला. इंदूर – पुणे महामार्गावरील मनमाड बसस्थानकाच्या परिसरात विद्युत तारा व झाले पडल्याच्याही घटना घडून गेल्या आहेत. याशिवाय नाशिक. पुणे, जालना जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Leave a Reply