Thackeray Brothers : हिंदी GR रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंचे मराठी जनतेला एकत्रित पत्र ; आम्ही वाट बघतोय…
मुंबई : 01/07/2025
येत्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray Brothers) यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रणाचं एक पत्र व्हायरल होत आहे. मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा हा हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ऐतिहासिक विजयी मेळावा पार पडणार आहे. व्हायरल होणाऱ्या पत्रात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी माणसाच्या एकजुटीने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी थेट मराठी जनतेला उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आलंय.
या पत्राचं शिर्षक आवाज मराठीचा असं असून यामध्ये असं म्हटलय की, मराठी मातांनो, भगिनींने आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं..! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! वाट बघतोय..! असं आवाहन ठाकरे बंधुंकडून करण्यात आलयं. तर 5 जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्याकडून मराठी जनतेला निमंत्रण देण्यात आलंय.
Leave a Reply