Mhada Lottery 2025

MHADA Lottery 2025 : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी अशी म्हाडा घरांची योजना आहे. आता म्हाडासाठीची प्रतिक्षा संपली आहे. तब्बल 5000 घरांची आणि काही भूखंडांची लॉटरी म्हाडाने आणली आहे. 

मुंबई : 14/07/2025 

कोकणात तुम्ही जर घर घेण्याचे स्वप्न बघत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा कोकण महामंडळाकडून तब्बल 5,000 हून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, ही संधी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मध्यम वर्गीयांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. लॉटरी विविध योजनांतर्गत घेण्यात येणार आहे. अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहे. 

म्हाडा कोकण मंडळाने आजपासून जाहीर केलेल्या लॉटरीपर्यंत एकुण 5,362 सदनिका आणि 77 भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. ही घरे व भूखंड पुढील पाच घटकांत विभागण्यात आले आहेत. 

म्हाडाची घरे आणि भूखंड –  (MHADA Lottery 2025)

1.  20 % सर्वसमावेशक योजना – 565 सदनिका 

2.  15 % एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – 3002 सदनिका 

3.   म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका ) – 1,677 सदनिका 

4.  50 % परवडणाऱ्या सदनिकांची योजना – 41 सदनिका 

5.  भूखंड विक्री योजना – 77 भूखंड 

पुढील तारखांप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता  (MHADA Lottery 2025)

ऑनलाईन अर्ज सुरू – 14 जुलै 2025 

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 13 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 

अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत – 14 ऑगस्ट 2025, रात्री 11.50 

प्रारूप पात्र यादी जाहीर – 21 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6.00 

दावे व हरकती सादर करण्याची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6.00

अंतिम पात्र यादी जाहीर – 1 सप्टेंबर 2025, सायंकाळी 6.00

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: MHADA Lottery 2025

https://Housing.mhada.

सर्व अर्ज ऑनलाईन माध्यमातून स्विकारले जाणार आहेत. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे संपूर्ण व अचूक असावीत. पात्रतेच्या आधारावर संगणीकृत प्रणालीद्वारे लॉटरी काढली जाणार आहे. स्वतःचे हक्काचे घर करण्याचे स्वप्न साकार करण्याती ही चांगली संधी आहे.  

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!