Makranda Anaspure On Maratha Reserveation : हैद्राबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर मकरंद अनासपुरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी याविषयीचे मोठे वक्तव्य केले आहे.
मुंबई : 19/09/2025
सरकारने राज्यात हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढला आहे. मात्र त्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आहे. मराठी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या हैद्राबाद गॅझेटला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी त्यांची मागणी आहे. या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मकरंद अनासपुरे म्हणाले की, समाज तुटु नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी ही सरकारला विनंती आहे, असे देखील अनासपुरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
राज्यात सध्या हैद्राबाद गॅझेटवरून एक संघर्ष निर्माण झाला आहे, तो म्हणजे बंजारा समाज आणि आदिवासी समाज समोरासमोर संघर्षासाठी उभे ठाकले आहेत. हैद्राबाद गॅझेटनुसार आमचा समावेश हा एसटीमध्ये करावा अशी मागणी आता बंजारा समाजानं केली आहे. तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजानं जोरदार विरोध केला आहे. या मागणीविरोधात आदिवासी समाजाचे नेते एकवटले आहेत.
मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया (Maratha Reserveation )
राज्यात सध्या सुरू असलेल्या ओबीसी विरोधात मराठा आणि बंजारा विरोधात आदिवासी वादावर मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते. आपण भावंडांसारखे आणि एक समाज म्हणून राहतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा एकत्रितपणे आपण धावून जातो. एका मोळीची आणि एका लाकडाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. मोळीच्या अवस्थेत आहोत तोपर्यंत तोडणे शक्य नाही आणि लाकूड होत गेलो तर तोडणं सोपं होईल, गावकी आणि भाऊकी एकत्र होती ती अशीच एकत्र रहावी हीच मनापासून भावना आहे, असं मकरंद अनासपुरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की, पाण्याची चळवळ आम्ही केवळ चालवली नाही, तर त्याचा दशकपूर्ती सोहळा साजरा केला आहे. यंदा पाऊस जास्त झाला, निसर्गाता अंदाज कोणालाही येत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात निसर्गाचे रौद्ररूप पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी यावेळी अनासपुरे यांनी केली आहे.
Leave a Reply