Manoj Jarangeमराठा आरक्षण मुद्दयावरून मनोज जरांगेंचा विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल

Manoj Jarange : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या टिकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ओबीसींच्या 374 जातींचे नुकसान कोणी केले, याचा विचार करावा असे ते म्हणाले आहेत.

मुंबई : 06/10/2025

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange )  यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक भूमीका घेतली आहे. महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा सध्या जोमात आहेत. राजकीय वातावरण तापलेले आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या चिंता वाढल्या आहेत. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसचे नेते आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली होती. ते म्हणाले होते की,” एकाच समाजाला सर्व काही पाहीजे. ईडब्ल्युएस पाहिजे, ओबीसी पाहिजे,आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी मधून फायदा पाहिजे. महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही ? जरांगे पाटील यांनी सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे.

ही जी सत्तेची दादागिरी आहे ती बरोबर नाही”. वडेट्टीवार यांच्या या संतत्प प्रतिक्रियेवर आता जरांगेनी तोंड उघडले आहे. मनोज जरांगे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन, त्यांना उत्तर दिले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांना विजय वजेट्टीवार यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. ओबीसीच्या 374 जाती नेमक्या कोणी संपवल्या याबद्दल चिंतन करा. ओबीसी समाजाच्या लोकांनी यावर चिंतन करायला हवं. ओबीसींना यांनी आमचे मराठ्यांचे 16 टक्के आरक्षण दिले. ओबीसींचा घात हा येवल्याच्या अलिबाबाने आणि आता वडेट्टीवार आणि पूर्वी त्यांचे जे कोणी नेते होते, त्यांनी केला आहे, असा आरोप जरांगेनी (Manoj Jarange ) केला.

शरद पवारांनी आमचं वाटोळं केलंच…(Manoj Jarange )

मंडल कमिशनने 14 टक्के आरक्षण ओबीसींना दिले. हे पक्क झालं होतं. मग 16 टक्के आरक्षण हे मराठ्यांचं आहे, हे मराठ्यांच्या नावावर आहे, हे माहिती असतानाही दिले, याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक, वाटोळं कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानेच ओबीसीला उद्धवस्त केले आहे. कारण आमचं आरक्षण 16 टक्के आम्हाला मिळणार आहे. ज्यांनी दिलं त्याचे यांना उपकार नाही. आमचं तर दिलंच आहे, देणाऱ्यांनी आमचे वाटोळं केलं. ज्यांनी 1994 ला 16 टक्के आरक्षण आम्हाला दिले, उदाहरणार्थ शरद पवारांनी..त्यांनी आमचं वाटोळं केलंच समजा. पण त्याच पवारांनी यांचेही उपकार ठेवले नाहीत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली (Manoj Jarange )

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मोर्चाबद्दलही भाष्य केले. मोर्चा काढू द्या, काय होते आतापर्यंत 16 टक्के आरक्षण मराठ्यांचा खाल्ले आहे. ते म्हणतील तसं होणार नाही. हैद्राबाद गॅझेट जीआर काढलेला आहे. आमची प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली आहे. कितीही बोलू द्या धक्का लागणार नाही. एक खंत आहे त्यांना काहीही बघितले जात नाही. मात्र मराठ्यांना नियमात असून देखील संघर्ष करावा लागत आहे. सगळे पुरावे असताना आम्हाला त्रास दिला जातोय.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!