Mahashivratri 2026 : हिंदू म्हणजे अर्थात सनातन धर्मामध्ये सण, समारंभ आणि धार्मिक दिवसांना अनन्य साधारण महत्त्व आहे. वर्षभरात अनेक सण-समारंभ साजरे होतात. काही दिवसांना उत्सवांचे स्वरूप असते, तर काही दिवसांना धार्मिक आणि सनातन महत्त्व आहे. असाच एक पवित्र आणि महत्त्वाचे दिवस म्हणजे ‘महाशिवरात्र’ हा दिवस. जाणून घेऊयात या वर्षीच्या महाशिवरात्रीच्या दिवसाची तारीख, वेळ आणि त्याचे महत्त्व.
महाशिवरात्र : 12-02-2026
या वर्षी म्हणजे 2026 मध्ये महाशिवरात्रीचा दिवस हा 15 फेब्रुवारीला म्हणजे रविवारी आहे. यादिवशी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचे व्रत केले जाणार आहे. संपूर्ण देशभरात हा दिवस भाविक आपल्या राज्यातील प्रथेप्रमाणे साजरा करताना दिसतात. महाशिवरात्री माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. मुख्य पूजा मध्यरात्री (निशीथ काळ) केली जात असल्याने, 15 फेब्रुवारीची रात्र ही ध्यानासाठी उत्तम वेळ असल्याते जाणकार सांगतात.
Table of Contents
कधी आहे 15 फेब्रुवारीला उत्तम मुहूर्त ? (Mahashivratri 2026)
चतुर्दशी तिथी सुरू होते 15 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 5:04 वाजता. चतुर्दशी तिथी समाप्त होईल, 16 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 5:34 वाजता.
कशी केली जाते पूजा (Mahashivratri 2026)
महाशिवरात्रीला बहुतेक ठिकाणचे भाविक सकाळी लवकर उठून स्नान करतात. स्वच्छ आणि शक्यतो पांढरे वस्र परिधान करून पूजेचा संकल्प करतात. शिवमंदिरात किंवा घरात शिवलिंगावर अभिषेक करतात. यासाठी पाणी ,दूध, दही, मध आणि तूप यांचा वापर केला जातो. महादेवाला अत्यंत प्रिय असलेली बेलपत्रे, पांढरी फुले, धोतऱ्याची फुले आणि भस्म अर्पण करतात.
यादिवशी सर्व भाविक शक्यतो उपवास करतात. फळे आण दूध घेऊन हे व्रत केले जाते. रात्री शिवाचे नामस्मरण करून रात्र जागवली जाते.
महाशिवरात्रीचे महत्त्व : (Mahashivratri 2026)
महाशिवरात्रीचा दिवस खास मानला जातो, कारण यादिवशी शिवलिंगात साक्षात महादेवाचा म्हणजे शिवाचा वास असतो, अशी मान्यता आहे. यादिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता. अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून, हा उत्सव ‘महाशिवरात्र’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी शिवतत्व नेहमीपेक्षा हजार पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करून, ‘ओम नमः शिवाय’ हा नामजप केल्याने भगवंताची कृपा होते, असे मानले जाते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.
प्रदोष काळ म्हणजे काय ? (Mahashivratri 2026)
महाशिवरात्री या दिवशी भगवान शिव ज्या कालावधीत विश्रांती घेतात त्याला प्रदोष किंवा निषिद्धकाल म्हणतात. या काळात भगवान शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात.
शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे ? (Mahashivratri 2026)
बऱ्याचदा भाविकांना शिवमंदिरात गेल्यावर पिंडीचे दर्शन कसे घ्यावे असा प्रश्न पडतो. कोणत्या दिशेने किंवा बाजूने शिवाच्या पिंडीचे दर्शन घ्यावे हा प्रश्न असतो. धर्म शास्रानुसार शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगांतून घ्यावे असे सांगतात. याला श्रुंग दर्शन असे म्हणतात. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवाव, उजव्या हाताची तर्जन (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगावर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यावर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे.
शिवाला प्रदिक्षणा कशी घालावी ? (Mahashivratri 2026)
शिवाची प्रदिक्षणा चंद्रकोरीप्रमाणे, म्हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत जातो त्याला सोमसूत्र म्हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदिक्षणा घालताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळूंकेचा पुढे नेलेला स्रोत )असतो. प्रदिक्षणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास, तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदिक्षणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक पन्हाळी न ओलंडता परत फिरून शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक प्रदिक्षणा पूर्ण करावी.
अशा प्रकारे विधीवत पूजा आणि व्रत करून शिवाजी आराधना केल्यास आयुष्यात समृद्धी येते असे मानले जाते. महाशिवरात्र हा दिवस भारताच्या सर्वच भागात उत्साहाने साजरा केला जाणारा दिवस आहे. विविध व्रत, पूजा, ध्यान करून यादिवशी भाविक शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.