Maharashtra State Commisson For Women

Maharashtra State Commission For Women : गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात वैशाली हगवणे या हुंडाबळीने आत्महत्या केलेल्या तरूणीचे प्रकरण तापले आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar ) आणि आयोगाच्या  (Maharashtra State Commission For Women )  कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. आयोगाचे फोन नंबर बंद असल्याचा आरोप झाला असताना आयोगाने या आरोपाचे खंडन केले आहे. 

मुंबई : 2025-05-27

 राज्यात सध्या वैशाली हगवणे हीच्या हुंडाबळीची चर्चा सुरू आहे. वैशाली हीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या मोठ्या जावेच्या मयुरी जगताप हीने केलेल्या पोलीस केस आणि महिला आयोगाकडील तक्रारींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवण्यात आले. तसेच काही सर्वसामान्य महिलांनी आयोगाच्या कार्यालयाचे फोन नंबरही बंद असल्याचे म्हटले होते. या सर्व आरोपाचे खंडन करत राज्याच्या महिला आयोगाकडून एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात महिलांच्या मदतीसाठी असणारे फोन नंबर , हेल्प लाईन नंबर देण्यात आले आहेत. ते फोन नंबर कायम सुरूच आहेत असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

(Maharashtra State Commission For Women ) – आयोगाने या पत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथील महिला आयोगाच्या कार्यालयाची वेळ सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 वाजे पर्यंत आहे. आयोगाच्या 155209 या समुुपदेशनाकरीता असणारा नंबर कार्यरत आहे.आजच  27 मे 2025 ला यावर एकुण 20 महिलांचे फोन आल्याचे पत्रकात म्हटले आहे.  त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे. 

महिलांसाठी पुढील दुरध्वनी क्रमांक कार्यालयीन वेळेत सुरू असतील. हे क्रमांक जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 

  • 022-26591142
  • 022-26592707
  • 022-26590474
  • 022-26590050

दुरध्वनीशिवाय महिला आयोगाचा पुढील ई-मेल आयडीसुद्धा कार्यरत आहे. 

[email protected]

112 आणि 181 हे हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहेत 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!