Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून धुवाँंधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थीती उद्भवली आहे. अतिवृष्टीमुळे 10 लोकांचा बळी गेला आहे. तर 11,800 लोकांना पूराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आले आहे. काय परिस्थितीती आहे महाराष्ट्रात ? जाणून घेऊ.
पुणे : 29/09/2025
महाराष्ट्रात परत एकदा पावसाने जोर धरला आहे. सलग गेले काही दिवस पाऊस सुरू आहे. सर्वत्र पूरसदृश्य परिस्थीती उद्भवली आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात पाऊस आणि त्यानिगडीत घटनांमुळे कमीत कमी 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यात 4, धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी 2 आणि जालना आणि यवतमाळ मध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या विविध भागातून सुमारे 11,800 पेक्षा जास्त लोकांना पूरातून वाचवण्यात आले आहे. मराठवाडा क्षेत्रातील छत्रपति संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पूराची परिस्थिती आहे. मुंबईमध्ये शनिवारी रात्रीपासून सलग पाऊस सूरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी भरले आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची खूण ओलांडली आहे. शहरातील रामकुंड भागातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. महाराष्ट्र सरकार आणि आपत्ती प्रतिबंधक विभागाने त्वरीत कारवाई करत राज्यभरात NDRF च्या 16 टीम तैनात केल्या आहेत. दोन टीन या पुण्यात अतिरिक्त ठेवल्या आहेत.
पुण्यात सर्वात जास्त पाऊस (Maharashtra Rain )
पुण्यातील मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटात मान्सूनच्या या सिझनचा सर्वात जास्त पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत 9,000 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यावर्षीचे सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणामध्ये मुळशीच्या ताम्हिणी घाटाचा समावेश झाला आहे. पूर्वी हे रेकॉर्ड पूर्वेकडील राज्य मेघालयच्या चेरापूंजी आणि मौसिनराम गावाकडे होते. मात्र यावर्षी पुण्याने हे पावसाचे रेकॉर्ड मोडले आहे.
जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले (Maharashtra Rain )
छत्रपति संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. रविवारी रात्री 12 वाजता हे दरवाजे उघडण्यात आले आहे. जिल्ह्यात 1,219 गावांमध्ये पूर आला आहे. धरणातून 3,06,540 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मात्र गोदावरी नदीची क्षमता 1 लाख क्यूसेक इतकीच आहे. यामुळे गोदावरी नदीभागात भयानक पूरस्थिती उत्पन्न झाली आहे.
पूराच्या भागात मदतकार्याला वेग (Maharashtra Rain )
महाराष्ट्र सरकारने पूरपरिस्थीती असणाऱ्या भागात मदत कार्य वेगाने सुरू केले आहे. स्थानीय प्रशासनाने पूरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. वीज विभाग आणि जल विभाग या भागामध्ये अधिक सक्रिय झाले आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्यातील ही पूरपरिस्थीती नियंत्रणात आणणे बरेच कठीण होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्या, धरणं दुथडी भरून वहात आहे. नागरिकांनी नदी आणि धरण भागापासून लांब रहावे असे आवाहान करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पावसाचे हे थैमान पुढील काही दिवस असेच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपत्ती प्रतिबंधक विभागाने सर्व जिल्ह्यांना सतर्क रहाण्याचा इशारा दिला आहे.
Leave a Reply