Crop Insurance For Maharashtra Farmers : महाराष्ट्र सरकार एक रुपयात पिक विमा योजना राबवत होती. या योजनेनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियमची पूर्ण रक्कम भरत होते. परंतु यावर्षीपासून त्यात बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावे लागणार आहे.
मुंबई : 07/07/2025
महाराष्ट्र सरकारने पिक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टकण्यात येणार आहे. यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती. परंतु आता पिक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिले होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
फसवणूक करणारे लाभ घेऊ शकणार नाही
अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र सरकारने मध्यस्थ आणि सेवा प्रदान कऱणाऱ्या संस्थेबाबत शेतकऱ्यांनाही काळ्या यादी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेचे लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणर आहे. एकदा काळ्या यादीत टाकल्यानंतर शेतकरी काही वर्ष पिक विमा योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही.
यापूर्वी अशी होती पद्धत
सरकारने म्हटले आहे की, सन 2024 मध्ये पिक विमा योजनेसाठी 4000 पेक्षा जास्त खोटे प्रस्ताव आले होते. त्यानंतर सरकारने अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर ( CSC) विरोधात कायदेशीर कारवाई केली. तसेच बीड, नांदेड, परभणी, पुणे, लातूर आणि जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले. यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सीएससी केंद्रावर होत होती. परंतु आता त्या शेतकऱ्यांनाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे, ज्यांनी खोटी कागदपत्रे सादर केली आहे.
योजनेत केला बदल
राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी सरकार एक रूपयात पिका विमा योजना राबवत होते. या योजनेनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियमची पूर्ण रक्कम भरत होते. त्यात घोटाळा होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. परंतु यावर्षापासून त्यात बदल कऱण्यात आला आहे, शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावे लागणार आहे. योजनेचा कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. सरकारने म्हटले आहे की, खऱ्या दाव्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सरकार बांधील आहे.
Leave a Reply