Mharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळी आधीच एक खुषखबर जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितच गोड होणार आहे. काय आहे ही घोषणा जाणून घ्या.
मुंबई : 22/09/2025
यंदा मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर परत एकदा वाढला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे ( Maharashtra Farmers ) मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मात्र आता या होत असणाऱ्या नुकसानाच्या संकटात शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार भरपाई देईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. भरणे यांनी सांगितले आहे की, नदीकाठच्या जमिनीची माती वाहून गेल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल आणि शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील. दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
Leave a Reply