क्रांतिकारक चापेकर स्मारकाचे लोकार्पण, 1 मे पासून जनतेसाठी खुले
पुणेःचिंचवड – 18 एप्रिल 2025
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांची (British Rule) अनिर्बंध सत्ता होती, प्लेग काळात करण्यात आलेल्या अत्याचाराच्या विरूद्ध आवाज उठवण्यासाठी पुण्यातील चापेकर बंधूंनी (Chapekar Brothers) रँड या अधिकाऱ्याचा वध केला. त्यावेळची त्यांची प्रेरणा होती लोकमान्य टिळक (Loakmanya Tilak ). आपल्या सर्वांना माहितीच आहे की, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावकर (Swatantryavir Savarkar) हे दोन व्यक्तिमत्व अशी आहेत, ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली.
लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरूणांमधील स्फुल्लिंग जागृत केलं, त्यांच्यातील सळसळत्या रक्तात स्वातंत्र्य लक्ष्मीची अर्चना तयार केली. टिळकांनी मांडलेला हा विचार कुठेतरी चाफेकर बंधूंच्या मनात, डोक्यात जाऊन बसला.
त्यांच्याही मनात होतंच की अन्याय सहन करायचा नाही, मग त्यांनी ब्रिटन राणीच्या सोहळ्याच्या दिवशी इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला. मात्र त्यांच्याबाबत फितूरी होऊन ते पकडले गेले. ते पकडले गेले मात्र त्यांनी कुठल्याही परिस्थितीत पश्चाताप केला नाही. फाशी सारख्या प्रसंगालाही ते आनंदाने सामोरे गेले. हे सर्व तुम्हाला येथे अनुभवता येणार आहे.
क्रांतिकारक चापेकर बंधू यांचे निवासस्थान असणाऱ्या वाड्याचे रूपांतर एका खास संग्रहालयात करण्यात आले आहे. हे स्मारक पुण्यामधील चिंचवड (Chinchawad) गावात आहे. या संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
या संग्रहायलाचे उद्धाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी चापेकर बंधूंचा इतिहास उलगडून दाखवला.
यावेळी फडणवीस म्हणाले की, आज मनाला फार आनंद आहे, समाधान आहे, की क्रांतिकारक चाफेकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला मला सहभागी होता आले. मला स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यालाही उपस्थित रहाण्याची संधी मिळाली होती, आणि आजही उपस्थित रहाता आले आहे.
यासाठी मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो. एखाद्या घटनेने इतिहास बदलतो तसा हा चाफेकर बंधूच्या कृतीचा प्रसंग आहे. ज्याने त्यावेळी अनेकांना ब्रिटिश सत्तेविरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली.
या स्मारकाच्या निर्माणासाठी मी देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांचेही आभार मानतो, कारण आजपर्यंत आपल्याला मोजक्या क्रांतिकारकांच्या कथा माहित होत्या, मात्र मोदीजींनी देशभरातील सुमारे साडे बाराहजार क्रांतिकारकांच्या कथा आणि गाथा शोधून काढल्या आणि आपल्यापर्यंत पोहचवल्या.
स्वातंत्र्य आपल्याला मोफत मिळालेले नाही, या स्वातंत्र्याकरिता किती बलिदान दिलेलें आहे, कित्येकांनी स्वतःच्या प्राणांचे अर्पण केले आहे हे देखिल आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केले आहे.
हे जे काही स्मारक बनले आहे, ते फार सुंदर आहे. आणखी मोठे देशभरातील क्रांतिकारकांचे स्मारक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, अतिशय सुंदर असे स्मारक निर्माण झाले आहे, तंत्रज्ञानाचा अत्यंत उत्तम उपयोग या स्मारकामध्ये करण्यात आलेला आहे. एकुण चाफेकरांच्या जीवनातील महत्त्वाचे चौदा प्रसंग याठिकाणी पहायला मिळतात.
त्यासाठी निर्माण करण्यात आलेले पुतळे बघितल्यावर त्याठिकाणी प्रत्यक्ष ती व्यक्तीच त्याठिकाणि बसली आहे, असे वाटावे इतके सुंदर स्मारक करण्यात आले आहे. तो प्रसंग समजावून घेण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाची सोय करण्यात आलेली आहे. हा परिवार कसा होता, त्यांचे संस्कार कसे होते हे सर्व समजते.
कारागृहातील प्रसंग, रँड वधाचा प्रसंग पहाण्यासारखा आहे. पुण्यात त्याकाळी प्लेगची साथ आल्यावर ब्रिटीशांनी लोकांना फार त्रास दिला होता. अनिर्बंध वातावरणामुळे लोकांमध्ये प्रचंड राग होता. हे अन्यायाचे प्रकार थांबले पाहिजे, ब्रिटीशांना धडा शिकवला पाहिजे अशी मानसिकता होत होती.
त्यावेळी लोकमान्य टिळकांनी देखील हा भाव व्यक्त केला होता. कोणीतरी हे केलेच पाहिजे. काही प्रसंग आहेत ज्यात चाफेकर यांच्या कुटुंबातून अनेक समाजसुधारणेची ही कामे करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
चाफेकर बंधू हे छत्रपति शिवरांयांच्या (Chatrapati Shivaji Maharaj )एकुण चरित्रामुळे भारावलेले होते. त्यांच्यासाठी शिवाजी महाराज प्रेरणा होते, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी स्मारकाच्या निर्माणामध्ये ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे ते आदरणीय पद्मश्री गिरिश प्रभुणे, चंद्रकांत पलकुंडवार, विनयकुमार चौबे, शेखर सिंग, जितेंद्र डुडी, चाफेकर परिवारातील प्रशांत चाफेकर, प्रतिभा चाफेकर, स्मिता चाफेकर, चेतन चाफेकर, मानसी चाफेकर, जान्वही जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मारक भेटीसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय
क्रांतिकारक चाफेकर बंधूंच्या स्मारकाला भेट देण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयी उपलब्ध करून देण्याविषयीची सुचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक तरूण पिढीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याशिवाय पद्मश्री गिरिश प्रभुणु यांच्या गुरुकुल आश्रमाच्या विस्तारासाठी सुयोग्य जागा देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Leave a Reply