Literary Scholar Maruti Chitampally Passes Away : मराठी माणसाला ज्यांनी निसर्ग वाचायला शिकवला, ज्यांनी त्याविषयक साहित्याची मराठी रसिकांना गोडी लावली, असे ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांचे निधन.
महाराष्ट्र : 2025-06-18
ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारूती चितमपल्ली( Maruti Chitampally) (वय 93) यांचे निधन झाले आहे. त्यांना नुकताच पद्यश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार घेण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील एक थोर साहित्यिक, निसर्गप्रेमी हरवल्याची भावना समाजातून व्यक्त होते आहे. त्यांच्या मागे एक मुलगी आहे.
मारूती चितमपल्ली यांच्याविषयी
मारूती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 19321 ला एका गिरणी कामगाराच्या घरात झाला. त्यांना त्यांच्या निसर्गावरील अभ्यास आणि पक्ष्यांविषयीच्या प्रेमामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जाते. वनाधिकारी म्हणून नोकरी करत असताना, त्यांनी वन, वन्यप्राणी आणि पक्षी यांच्यावर विपूल लेखन केले. त्यांनी पक्षी कोष तयार केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य या एकाच कामासाठी वाहून घेतले होते. त्याच कार्यासाठी त्यांना यंदाचा पद्यश्री पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या आयुष्यातील हाच महत्त्वाचा पुरस्कार अखेरचा ठरला.
Leave a Reply