Ladaki Bahin Yojana : आज 5 जुलै ली मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बाब समोर आणली. काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे ? जाणून घेऊ.
मुंबई : 05/07/2025
पहिलीपासून हिंदी सक्ती नको, यासाठी मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन मोर्चा काढणार होते. मात्र त्याआधीच सरकारने त्याविषयीचा जीआर रद्द करून, ठाकरे बंधूंचे एकप्रकारे म्हणणे मान्य केल्याचे दिसून आले. मात्र 5 जुलैला होणारा मोर्चा आता ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्यात बदलला. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. जवळपास 18 वर्षांनी हा योग जुळून आला. यावेळी दोन्ही बंधूंनी भाषणातून राजकीय फटकेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेविषयीची मोठी पोलखोल केली आहे.
योजनेबाबत मोठी अपडेट
महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती. या योजनेचे नाव मुख्यंमंत्री लाडकी बहीण योजना असे देण्यात आले होते. ही योजना गेमचेंजर ठरली होती. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात ही अपडेट दिली आहे. नव्याने नोंदणी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजने संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद होणार आहे. नव्याने नोंदणी होणार नाही. आता बसा बोंबलत. देशात सर्वाधिक कर्जभाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र थांबणार नाही. कर्ज काढतच रहाणार.
अदिती तटकरेंनी दिेलेली माहिती
मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेबाबत काही माहिती दिली होती. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. 2 हजार 289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे सर्वांना माहित होते . मात्र आता उद्धव ठाकरे यांनी नविन नोंदणी बंद होणार असल्याची माहिती सांगितली आहे. मात्र अधिकृत रित्या या खात्याकडून असे काहीही सांगण्यात आले नाही.
Leave a Reply