Ladki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या अटी दिवसेंदिवस कडक होत आहेत. त्यात आता या योजनेविषयीची मोठी बातमी समोर येत आहे. गरजू, आर्थिक दुर्बल महिलांसाठी ही योजना सरकारने सुरू केली होती. मात्र याचा लाभ सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलाही घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. 

महाराष्ट्र  : 2025-05-31

महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वकांक्षी आणि लोकप्रीय योजना म्हणजे लाडकी बहिण योजना. समाजातील वंचित, गरीब महिलांना आधार मिळावा यासाठी ही योजना आहे.मात्र जसजसे या योजनेचा फायदा कोणाला होत आहे, याची कसून चौकशी होत आहे, त्यातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या योजनेचा लाभ स्वतः सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला सुद्धा घेत आहेत, असे तपासणीत दिसून आले आहे. अशा महिलांविषयी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात येत आहेत.

शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, ही सर्वात लोकप्रीय योजना आहे. या योजनेतून अनेक वंचित, आर्थिक दुर्बल घटकांमधील महिलांना आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रूपये जमा करण्यात येतात. ही योजना सुरू झाली तेव्हा महिलांचा याला भरगोस प्रतिसाद मिळाला. मात्र ही योजना सुरू केली, तेव्हा शासनाने काही अटी, शर्ती लाभार्थी महिलांसाठी लागू केल्या होत्या. परंतु आता शासनाने लाभार्थी महिलांची कसून पडताळणी केली असता, काही महिला अशा आहेत ज्या स्वतः सरकारी कर्मचारी आहेत, तरीही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा महिलांचे अर्ज बाद केले आहेत. शासनाने त्यांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या शासनाकडून लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. अनेक महिलांचे उत्पन्न हे अडिच लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या नावावर घर, चारचाकी गाडी आहे. अशा महिलाही योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र आता सरकारी कर्मचारी महिलासुद्धा हा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. यासंबधीची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे.

 

‘लाभार्थ्यांची पडताळणी’ हा योजनेचा लाभ 

लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सर्वार्थ मधील जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचारी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लक्षात आली असून तेव्हापासून अशा महिलांना कोणताही लाभ वितरीत करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमीतपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे. असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!