• Home
  • आंतरराष्ट्रीय
  • Iran – Israel Tension, Which Country Does India Have The Largest Industrial Transactios With Iran Or Isreal? ? : इस्रायल की इराण? कोणत्या देशासोबत भारताचा अब्जावधींचा व्यवहार? सामान्यांवर कसा होणार परिणाम, पाहा…
Iran Israel

Iran – Israel Tension, Which Country Does India Have The Largest Industrial Transactios With Iran Or Isreal? ? : इस्रायल की इराण? कोणत्या देशासोबत भारताचा अब्जावधींचा व्यवहार? सामान्यांवर कसा होणार परिणाम, पाहा…

Iran Israel Tension : एकिकडे  रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव कमी होत नसतानाच, दुसरीकडे इराण आणि इस्रायलमध्येसुद्धा वादाची ठिणकी पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही देशांमधील तणावाचा थेट परिणाम जागतिक स्तरावरील व्यापारावर होत असून भारतीय अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय : 2025-06-22

इराण जगभरातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल उत्पादक देश असून, मध्य पूर्वेमध्ये हा देश तेल उत्पादनात अग्रस्थानी आहे. 2023 च्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास इराणमध्ये 2.4 बिलियन बॅरल क्रूड ऑईलचं उत्पादन झाल्याची माहिती मिळते. एकूण तेल उत्पादनापैकी साधारण अर्ध्या उत्पादनाची विक्री इराण इतर देशांना करत असून चीन त्यांचा सर्वात मोठा खरेदीदार असल्याचं सांगण्यात येतं.

तेल खरेदीदारांमध्ये भारताचाही समावेश असून फक्त तेलच नव्हे, तर भारतात इराणकडून इतरही सामानाची आयात केली जाते आणि त्याच व्यापारावरही आता या तणावाचं सावट स्पष्टपणे दिसत आहे. भारतात इराणमधून सुकामेवा, रसायनं, काचेची भांडी आणि तत्सम गोष्टींची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. तर, भारताकडून इराणमध्ये बासमती तांदुळ निर्यात केला जातो.

2014 ते 2015 मध्ये भारताकडून बासमती तांदुळ आयात करणाऱ्या देशांमध्ये इराण दुसऱ्या क्रमांकावरील देश ठरला. तर, 2022-23 च्या आर्थिक वर्षात इराणनं भारताकडून 998,879 मेट्रिक टन इतका तांदूळ आयात केला होता. याशिवाय इराण भारताकडून चहा, कॉफी आणि साखरेचीही आयात करतो.

इराण भारताकडून दरवर्षी 4 कोटी किलो चहा, 19 टक्के बासमती तांदुळ आयात करतो आणि हा संपूर्ण व्यवहार साधारण 60 कोटी डॉलरच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, सध्याची तणावाची परिस्थिती पाहता आयात आणि निर्यातीच्या या व्यवहारावर सावट येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इस्रायलसोबतही भारताचा मोठा व्यापार…

फक्त इराणच नव्हे, तर इस्रायलसुद्धा भारताशी व्यापाराच्या या विश्वात सक्रिय असून, 2023 मध्ये भारतानं इस्रायलसोबत 89000 कोटींचा व्यवहार केला होता. भारताकडून इस्रायलला मौल्यवान हिरे, दागदागिने, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग सामग्री देण्यात आली होती, तर इस्रायलकडून भारतानं लष्करी सामग्री आयात केली होती.

दोन्ही देशांसोबत भारताचा असणारा व्यवहार आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्ट्रीट्यूटच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दोन्ही देशांसोबत भारताचा आयात आणि निर्यातीचा व्यवहार पाहता सध्या उद्भवलेली तणावाची परिस्थिती पाहता या आर्थिक व्यवहारांवर कमीजास्त प्रमाणात थेट परिणाम दिसून येणार ही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सामान्य नागरिकांच्या खिशावर या आंतरराष्ट्रीय तणावग्रस्त परिस्थितीचा नेमका कसा परिणाम होईल यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर आणि तत्सम गोष्टींच्या दरांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं असेल.

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025