Indore 24 Third Gender Newsइंदौरमध्ये 24 तृतियपंथींनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Indore Third Gender : इंदौर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकावेळी 24 तृतियपंथींनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. जाणून घ्या घटनाक्रम.

इंदौर : 16/10/2025

बुधवारी संध्याकाळी सुमारे 24 तृतियपंथींनी एकावेळी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. इंदौरच्या नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वादात एका गटातील सुमारे 24 तृतीयपंथींनी विष प्यायले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. विष प्यायल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर अवस्थेत तृतियपंथींना रूग्णालयात दाखल केेले. ॲडिशनल डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की प्राथमिक तपासात फिनायल प्यायचे असल्याती बाब समोर आली आहे.सत्यांनी कोणत्या प्रकारचा पदार्थ प्यायला घेतला आहे, याची खात्री तपासानंतप स्पष्ट होईल.

काय आहे प्रकरण ?  (Indore 24 Third Gender News)

24 तृतियपंथींवर एमवाय रूग्णालयात उपचार चालू आहेत. सीएमएचओ यांना सूचना देण्यात आल्या आहेत की सर्व तृतियपंथींवर योग्य ते उपचार केले जात आहे. रूग्णांची स्थिती स्थिर आहे. विषारी पदार्थ का प्यायले याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

काही काळापूर्वीच या परस्परविरोधी वादात दोन मीडियाकर्मींनी एका तृतियपंथीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते. अनेक दिवसांपासून चालू असलेल्या या तृतियपंथींच्या वादात पूर्वी  एसआयटी गठित झाली होती, पण एका मोठ्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर एसआयटी देखील शांत बसली.

जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन सतर्क (Indore 24 Third Gender News)

पंधरीनाथ पोलिस स्टेशन क्षेत्रात घडलेल्या या दुःखद घटनानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन सतर्क आहे. कलेक्टर शिवम शर्मा यांच्याकडून क्षणाक्षणाची माहिती घेतली जात आहे. एमवाय रूग्णालयात सर्व तृतियपंथींवर उपचार सुरू आहेत. डीसीपी आनंद कलाडगी यांनी सांगितले की घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि प्रभावित एकुण 24 तृतियपंथीना एम्ब्युलन्सद्वारे एमवाय रूग्णालयात आणले गेले. सर्वांवर उपचार सुरू आहे. स्थिती नियंत्रणात आहे. पुढील चौकशी रूग्णांच्या तब्येतीत स्थिरता आल्यावर होणार आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!