Indias First Bullet Trainभारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा 'फर्स्ट लूक' समोर ! ताशी 280 किमी वेग ; रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले अधिकृत डिझाईन.

Indias First Bullet Train :  भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे अधिकृत डिझाईन जाहीर केले आहे. ताशी 280 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचे काम मुंबई आणि गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे.

नवी दिल्ली : 18-05-2026 

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे (Bullet Train) स्वप्न आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनचे (Indias First Bullet Train), अधिकृत डिझाईन जाहीर केले आहे. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट नंबर- 4 वर या अत्याधुनिक ट्रेनचे भव्य छायाचित्र लावण्यात आले असून, ते पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताच्या वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या या ‘सुपरफास्ट’ ट्रेनची ही पहीली अधिकृत झलक मानली जात आहे. हा प्रकल्प मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर धावणार असून, यामुळे देशातील रेल्वे प्रवासाचे एक नवीन युग सुरू होणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद : 508 किमीचा प्रवास अवघ्या काही तासांत (Indias First Bullet Train)

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा 508 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. ही हाय-स्पीड ट्रेन महाराष्ट्र, गुजरात आणि दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून धावणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण 12 स्थानके निश्चित कऱण्यात आली आहेत. यामध्ये :

महाराष्ट्र : मुंबई (BKC), ठाणे, विरार, बोईसर

गुजरात व इतर : वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद. अहमदाबाद आणि साबरमती

प्रकल्पाचे काम जोमाने (Indias First Bullet Train)

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार गुजरात मधील सर्व 8 स्थानकांच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातही ठाणे, विरार आणि बोईसर दरम्यान बांधकाम प्रक्रियेला वेग आला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील भूमिगत स्टेशनसाठी खोदकामाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या समुद्रातील बोगद्याचे कामही अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ताशी 280 किमीचा वेग (Indias First Bullet Train)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेतंर्गत या बुलेट ट्रेनचे कोच भारतातच तयार केले जात आहेत. चेन्नईचे ‘ इंटिग्रेल कोच फॅक्टरी (ICF) आणि बेंगळूरूपी BEML या कंपन्या संयुक्तपणे या ट्रेनचे सेटस विकसित करत आहेत. रेल्वेच्या तांत्रिक अहवालानुसार, या ट्रेनचे डिझाईन स्पीड ताशी 280 किलोमीटर इतका प्रचंड असेल. यामुळे मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा तासांचा प्रवास काही मिनीटांवर येणार आहे.

जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय गरजांचा मेळ (Indias First Bullet Train)

हा संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प जपानच्या जगप्रसिद्ध शिनकानसेन हाय स्पीड रेल तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केला जात आहे. मात्र याचे डिझाइन भारतीय हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि प्रवाशांचा गरजा लक्षात घेऊन खास पद्धतीने मॉडिफाय करण्यात आले आहे. सुरक्षा, आराम आणि जागतिक दर्जाच्या डिजिटल सुविधांनी ही ट्रेन सज्ज असेल, रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय इतिहासातील क्रांती (Indias First Bullet Train)

ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ञांच्या मते, हा प्रकल्प केवळ एक ट्रेन नसून भारताच्या आर्थिक विकासाला गती देणारे इंजिन ठरेल. यामुळे दोन मोठ्या राज्यांमधील व्यापार वाढेल, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!