India First Private Rocket Vikram -Iभारताची मोठी भरारी ! खासगी अंतराळ क्षेत्रात घेतली मोठी झेप, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ' Vikrant-I' रॉकटचे अनावरण

India First Private Rocket Vikram -I : स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस आणि विक्रम -1 रॉकेट प्रक्षेपण आज करण्यात आले. या रॉकेटचे प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक मोठे पाऊल समजले जात आहे. जाणीन घेऊ या रॉकेटविषयीची सर्व माहिती.

हैद्राबाद : 27/11/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी हैद्राबाद येथे स्कायरूट एरोस्पेसच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’;चे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी कंपनीच्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’ अनावरण  (India First Private Rocket Vikram -I) केले. तीन वर्षांपूर्वी उद्योजकांसाठी खुले केलेल्या भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यापूर्वी स्कायरूटने नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचे पहिले खासगी सब-ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-एस’ यशस्वीरित्या प्रक्षेपित केले होते.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले ? (India First Private Rocket Vikram -I)

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे अंतराळ क्षेत्र वेगाने बदलत आहे आणि देशाने ‘विश्वसनियता, क्षमता आणि मूल्य’ या त्रिसूत्रीवर आपली ओळख निर्माण केली आहे. “युवा पिढीची नाविन्यता आणि जोखीम घेण्याची क्षमाता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात भारत उपग्रह प्रक्षेपणामध्ये जगाचे नेतृत्व करेल”, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

संशोधनावर भर  (India First Private Rocket Vikram -I )

त्यांनी ‘नॅशनल रिसर्च फाउंडेशन’, ‘वन नेशन’, वन सब्सक्रिप्शन’ आणि 1 लाख कोटींच्या रिसर्च आणि इनोव्हेशन फंडासारख्या प्रयत्नांमुळे तरूणांसाठी मोठ्या संधी निर्माण केल्या जात आहेत. गेल्या सहा-सात वर्षात अंतराळ क्षेत्राला अधिक खुले आणि नाविन्यपूर्ण बनवले गेले असून, भारताची क्षमता आता जगातील काही निवडक देशांच्या बरोबरीची आहे, असेही ते म्हणाले.

  • विक्रम -1 ची रचना कशी आहे ?
  • विक्रम-1 ची रचना चार टप्प्यात करण्यात आली आहे.
  • पहिला टप्पा – (Kalam-1200) : सॉलिड-फ्युल बूस्टर, जो सुरूवातीचा थ्रस्ट देतो.
  • दुसरा टप्पा – (Kalam-250) : मध्य- उड्डाणात रॉकेटला पुढे ढकलतो.
  • तिसरा टप्पा – ( Kalam-100): अंतराळातील व्हॅक्युममध्ये काम करतो, विशेष कार्बन एब्लेटिव नोजलने सुसज्ज.
  • चौथा टप्पा – (Raman-100) : यात चार रमन इंजिन आहेत, जे अचूक दिशा नियंत्रण आणि उपग्रहांची योग्य स्थिती निश्चित कऱण्यात मदत करतात.

इन्फिनिटी कॅम्पस म्हणजे काय ?  ( India First Private Rocket Vikram -I )

1 स्कायरूटचा नवा ‘ इन्फिनिटी कॅम्पस’ सुमारे 2 लाख चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेला एक अत्याधुनिक केंद्र आहे.

2 येथे रॉकेटले डिझाईन, डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि चाचणी एकाच ठिकाणी केली जाऊ शकते.

3 या सुविधेमुळे स्कायरूट कंपनी दरमहा एक ऑर्बिटल रॉकेट बनवण्याची क्षमता ठेवते.

4 IIT चे माजी विद्यार्थी आणि इस्रोचे माजी वैज्ञानिक पवन चंदना आणि भरत डाका यांनी स्कायरूटची स्थापना केली आहे. ‘विक्रम-एस’च्या यशानंतर, श्रीहरिकोटा येथून रॉकेट प्रक्षेपित करणारा स्कायरूट हा भारतातील पहिला स्टार्टअप बनला.

विक्रम- 1 रॉकेटची वैशिष्ट्य  (India First Private Rocket Vikram -I)

‘विक्रम -1’ हे स्कायरूटचे पहिले ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे, जे छोटे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी बनवले आहे.

वैशिष्टय् माहिती
नाव. विक्रम-1 (भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून)
आकारमान 20 मीटर उंच, 1.7 मीटर व्यास
संरचना  पूर्णपणे कार्बन-कॉम्पोझिट समाग्रीने बनलेले

 

क्षमता  मिशननुसार 260 ते 480 किलोपर्यंतचा भार कक्षेत वाहून नेऊ शकते.

 

लॉन्चची तयारी.  24 ते 72 तासांत कोणत्याही लॉन्च साईटवरून असेंबल करून प्रक्षेपित केले                                             जाऊ शकते.
प्रक्षेपण एकाच मिशनमध्ये अनेक उपग्रह तैनात कऱण्याची क्षमता

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!