Nagpur News, Milk Bank : नवजात बालकांसाठी येथील रूग्णालयाच मिल्क बँक तयार करण्यात आली आहे. जुलै महिन्यात ही मिल्क बँक सर्वांसाठी खुली होणार आहे. आता नवजात बालकांना पावडरच्या दुधाऐवजी आईचे दूध उपलब्ध होणार आहे.
नागपूर : 2025-06-21
नवजात बालकांसाठी आईचे दूध म्हणजे अमृत. त्यांच्या एकुण विकास आणि प्रतिकार शक्तीवाढण्यासाठी आईचे दूध सर्वात जास्त आवश्यक मानले जाते. मात्र काही कराणांनी काही नवजात मातांना स्तनपान करणे शक्य होत नाही. अशा मातांच्या बालकांसाठी ‘मानव दूध बँक’ (Human Milk Bank) हे वरदान ठरणारे आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय या ठिकाणी अशी मिल्क बँक तयार झाली आहे. या महिन्याच्या शेवटी ही सर्वांसाठी खुली केली जाणार आहे. या बँकेमुळे आता नवजात बालकांना आईचे दूध उपलब्ध होणार नसेल, तेव्हा पावडरच्या दूधाऐवजी आईच्याच दूधाच पर्याय असणार आहे. या दूधामुळे बाळ लवकरच सृदृढ आणि सशक्त होण्यास मदत होणार आहे.
कोणासाठी फायद्याची ठरू शकते ही मिल्क बँक ?
वेळे आधीची प्रसुती, वजन कमी असणे, इतर आजार यासहित अनेक कारणांमुळे काही बालकांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात येते. असे बाळं संपूर्ण सशक्त होई पर्यंत आपल्या आईपासूनही वेगळे ठेवले जाते. अशावेळी आई स्तनपान करते, पण बऱ्याच वेळा ती करू शकत नाही. कधी कधी आईचा मृत्यू होतो. किंवा आईची सिझेरियन प्रसृती झाली असेल तर, आईला बाळाच्या कक्षात जाणे शक्य होत नाही. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने पावडरचे दूध बाळाला दिले जाते. मात्र आता या मिल्क बँकमुळे पावडरची गरज नाही. रूग्णालयातच मिल्क बँक असल्याने बाळांची सोय होणार आहे.
कसे, कोठे चालणार याचे कामकाज ?
ज्या स्तनपान करणाऱ्या माता आहेत, त्यांच्या बाळांच्या दूधाची गरज भागवून, त्यांचे दूध एकत्र केले जाणार आहे. हे दूध मिल्क बँकेत ठेवले जाणार आहे. या दूधामुळे त्या स्वतःसहीत दुसऱ्या बाळांनासुद्धा मदत करणार आहेत. रूग्णालयात नवजात चिकित्सा विभागाच्या अंतर्गत वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ही मिल्क बँक तयार करण्यात आली आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक सामग्री उलब्ध झाली आहे. मिल्क बँकची क्षमता 180 लीटर आहे. ज्या माता दूध येथे देणार आहेत, त्यांच्या दूधाचे प्रथम परिक्षण केले जाईल. त्यानंतर ते येथे साठवण्यात येणार आहे. मिल्क बँकचे काम हे रक्तपेढीसारखेच असणार आहे. मिल्क बँक मधील दूध हे वातनुकूलित यंत्रणेत साठवण्यात येणार आहे. बालकांना आईचे दूध मिळाल्याने त्यांच्यात कुठल्याही आजाराचे संक्रमण होण्याता धोका कमी आहे. शिवाय एखादा आजार झाला असेल तो लवकर बरा होतो.
बालरोग तज्ञ विभागाचे डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले की, मिल्क बॅक बनवून तयार झाली आहे. लवकरच ती कार्यरत होणार आहे. या सुविधेमुळे नवजात बालक आणि त्याच्या पालकांना बरीच मदत होणार आहे. ज्या बालकांच्या आईचा मृत्यू झाला,किंवा एखाद्या आईला दूध येत नाही अशा बालकांसाठी आता आईचे दूध उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्या सहकार्याने ही मिल्क बँक तयार झाली आहे.
Leave a Reply