Himachal Marriage 2025

 Himachal Marriage 2025 : हिमाचल प्रदेशातील दोन भावंडांनी एकाच महिलेशी लग्न केले आहे. का केलंय त्यांनी असं ? हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यांच्या प्रदेशातील या परंपरेविषयी माहिती सांगत वधूने या लग्नाची माहिती दिली आहे. 2025 मध्येही अशा परंपरा पाळल्या जात आहेत, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

शिलाई : 20/07/2025

हिमाचल प्रदेशातील शिलाई गावात एक अनोखा विवाहसोहळा (Himachal Marriage 2025 )  पार पडला. हट्टी जमातीतील दोन भावडांनी एकाच महिलेशी लग्न केलं. हे लग्न बहुपतीत्वाच्या परंपरेनुसार झालं. हट्टी जमातीतील ही परंपरा गेल्या अनेक शतकांपासून आहे. प्रदिप आणि कपील नेगी हे दोघे सख्खे भावडं आहेत. त्यांनी सुनिका चौहानशी लग्न केलं आहे. आम्ही कोणत्याही दबावाशिवाय निर्णय घेतल्याचं या तिघांनी स्पष्ट केलं. सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स -गिरी भागात 12 जुलै ला या लग्नसोहळ्याची सुरूवात झाली होती. त्यानंतर तीन दिवस विविध विधी आणि कार्यक्रम पार पडले. या लग्न समारंभाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

एकाच महिलेशी लग्न का ? ( Himachal Marriage 2025 )

सुनीता चौहान ही कुन्हट गावची रहिवासी आहे. मला बहुपतित्व परंपरेबद्दल माहिती असून मी स्वतःहून लग्नाचा निर्णय घेतला, असं तिने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे या नात्याचा आदर करत असल्याचं तिने सांगितले. प्रदिप हा शिलाई गावात रहातो आणि एका सरकारी विभागात काम करतो. त्याचा धाकटा भाऊ कपिल हा परदेशात नोकरी करतो.”आम्ही ही परंपरा उघडपणे पाळली आहे, कारण आम्हाला त्याचा अभिमान आहे. हा आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे, असं प्रदीप म्हणाला. तर दुसरीकडे नोकरीसाठी परदेशात असलो तरी या लग्नाद्वारे पत्नीला आधार, स्थिरता आणि प्रेम देण्याचं वचन कपिलने दिलं “माझा पारदर्शकतेवर विश्वास आहे. आम्ही तिघंही एकत्र आनंदी जीवन जगू”. असा विश्वास त्याने व्यक्त केला. 

काय आहे हट्टी जमातीतील प्रथा   (Himachal Marriage 2025 ) 

हट्टी जमातीमध्ये आपल्या जमिनीची वाटणी होऊ नये यासाठी घरातील मुलं एकाच महिलेशी विवाह करण्याची जुनी परंपरा आहे. हट्टी जमात ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर स्थायिक आहे. तीन वर्षांपूर्वी या जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे. या जमातीमध्ये शतकानुशतकं बहुपतित्व प्रथा प्रचलित आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांमधील वाढलेलं शिक्षणाचं प्रमाण आणि परिसरातील आर्थिक विकासामुळे अशा लग्नांची प्रकरणं कमी झाली होती.” असे विवाह शांतपणे केले जातात आणि समाजही त्यांचा स्विकार करतो. परंतु आता असे प्रकार खुप दुर्मिळ आहेत. त्यामुळे हे झालेले लग्न सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

माजी मुख्यमंत्री वाय.एस.परमार यांनी बहुपतित्व परंपरेवर (Himachal Marriage 2025 ) संशोधन केलं होते. त्यांनी लखनऊ विद्यापीठातू हिमालयीन बहुपत्नीत्वाच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवर पीएचडी केली होती. त्यांच्या संशोधनातून या प्रथेबद्दल अनेक गोष्टी उघड झाल्या होत्या. तज्ञांच्या मते , या परंपरेमागील मुख्य कारण म्हणजे कुटुंबाची जमीन विभागली जाऊ नये. त्यांच्या मते, वडिलोपार्जित मालमत्तेत आदिवासी महिलांचा वाटा हा अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जमीन वाचवण्यासाठी अनेक भाऊ फक्त एकाच महिलेशी लग्न करतात. यामुळे कुटुंबातच जमीन रहाते असे येथील समुदायाचे म्हणणे आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!