सोन्याचा सध्याचा दर – 24 कॅरेट सोने -96,420 ला 10 ग्रॅम !
मुंबई : 21 एप्रिल 2025
सध्या भारतात लग्नसराईचा सिझन सुरू आहे. भारतीय लग्न आणि सोनं (Gold Rate ) यांचं अतूट नातं आहे. लग्नात सोनं खरेदी हे होते. पण यावर्षी सोन्याच्या दरांनी आपले शतक पार केल्याचे बघायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर तब्बल ९५ हजार झाल्याचे आज दिसून आले.
गेल्या काही वर्षात सोन्याचा दर वाढतचं गेल्याचे पहायला मिळत होते. मात्र यावर्षीच्या ऐन लग्नसराईत एका तोळ्यासाठी लाखात पैसे मोजावे लागणार आहे.
एप्रिल महिन्याच्या ३० तारखेला अक्षयतृतिया हा हिंदूंचा महत्त्वाचा दिवस आहे. त्यादिवशी महिला वर्गाकडून सोने खरेदीला प्राधान्य देण्यात येते. अशावेळी अक्षयतृतियेपर्यंत सोन्याच्या दर पर तोळा एक लाखापर्यंत जातील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील शहरातील आजचे सोन्याचे दर.
| शहर | 18 कॅरेट | 22 कॅरेट | 24 कॅरेट |
| अहमदाबाद | ₹ 72,410 | ₹ 88,500 | ₹ 96,550 |
| बैंगलोर | ₹ 72,380 | ₹ 88,460 | ₹ 96,500 |
| चेन्नई | ₹ 72,530 | ₹ 88,640 | ₹ 96,700 |
| दिल्ली | ₹ 72,200 | ₹ 88,240 | ₹ 96,260 |
| हैद्राबाद | ₹72,440 | ₹ 88,530 | ₹ 96,580 |
| कलकत्ता | ₹ 72, 230 | ₹ 88,280 | ₹96,300 |
| मुंबई | ₹ 72,320 | ₹ 88, 390 | ₹ 96,240 |
| पुणे | ₹ 72,320 | ₹ 88, 390 | ₹ 96,240 |
| सुरत | ₹ 72, 410 | ₹ 88, 500 | ₹ 96,550 |