Buldhana

Mysterious Diseases In Budhana : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्या आज एका विचित्र आजाराने त्रस्त आणि चिंताक्रांत  झाला आहे. येथे लोकांना विविध व्याधींनी हैराण केले आहे. काही विचित्र आजारांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक भयग्रस्त झाले आहे. 

बुलढाणा : 2025-06-17

आधी काही लोकांचे अचानक केसं गळायला लागले, नंतर नखं झडायला लागले आणि आता त्यांच्या हातांमध्ये खोल भेगा पडत आहेत. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात अचानक या समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथे लोकांना विविध आजारांनी वेढले असल्याणे, नागरिक भयग्रस्त झाले आहेत. 

आता ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अचानक हातांची त्वचा फाटत आहे, त्यात खोल भेगा पडल्याचे दिसून येत आहे. हे प्रकरण केंद्रीय स्वास्थ्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या खात्याशी निगडीत असल्याने, आता या अजब आजाराविषयी प्रशासनानेसुद्धा गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनामध्येही हलचालींना वेग आला आहे. 

पहिले केसं गळती, नंतर नखांची झडती आणि आता आणखी एक नवीन आजार (Mysterious Diseases In Budhana )

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव, खामगांव आणि नांदुरा परिसरात काही काळापूर्वी अचानक लोकांचे केसं गळती सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे नखं झडून जात असल्याचे दिसून आले. या सगळ्या प्रकारामधून लोकं अजून सावरले नव्हते, तर आता आणखी एक नविन आजारा त्यांना त्रास देत आहे. आता लोकांच्या हातांची त्वचा फाटत आहे. त्यात मोठ्या भेगा दिसून येत आहेत. मेहकर तहसील च्या शेलगांव नावाच्या गावांत आतापर्यंत 20 रूग्णांना या लक्षणांनी हैराण केले आहे. सुमारे 4 ते 5 हजार इतकी लोकसंख्या असणाऱ्या या गावात सध्या लोकं या आजाराच्या दहशतीत जगत आहेत. 

तपासणी पथकं गावात पोहोचली 

हा आजार संक्रमण करणारा तर नाही ? अशी लोकांना भिती वाटत होती. मात्र आरोग्य विभागाने त्वरीत कारवाई करत एका विशेष तपासणी करणाऱ्या पथकाची पाठवणी केली. 15 जूनला पाठवण्यात आलेल्या या पथकाच डॉ.प्रशांत तांगडे हे जिल्हा संक्रामक रोग सर्वेक्षण अधिकारी, बालाजी आद्रट त्वचा रोग विषेतज्ञ, डॉ. माधुरी मिश्रा चिकित्सा अधिकारी, स्वास्थ्य सेवक आणि आशा कार्यकर्ता पथकाने गावांत सर्वेक्षण केले. आणि 20 रूग्णांची संपूर्ण तपासणी केली आहे. 

पामो-प्लांटर त्वचा रोगाचे निदान, खबरदारी हाच उपाय 

तपासणी पथकाने केलेल्या पहाणीनुसार 20 रूग्णांपैकी 14 रूग्ण हे पामो-प्लांटर एक्जिमा, पामो-प्लांटर डर्मा आणि पामो-प्लांटर सोरायसिस सारख्या त्वचा संबंधीत रोगाने पीडित असल्याचे समजले. या रोगात विशेषकरून हात, पाय यांचे तळवे यांची त्वचा कोरडी पडून फाटते आणि त्यात भेगा पडतात. 

आरोग्या विभागाकडून सूचना 

  • हात आणि पाय यांना रसायनांच्या संपर्कात न आणणे 
  • साबण, डिटर्जंट, खतं आणि किटकनाशकं यांच्या वापरावेळी हातात हातमोज्यांचा वापर करावा. 
  • कोरड्या त्वचेवर कायम मलम अथवा मॉईश्चरायझर लावा. 
  • जर खाज किंवा भेगा जास्त जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

घाबरण्याचे कारण नाही, खबरदारी घेणे आवश्यक 

हा आजार संसर्गजन्य नाही. तरीही ग्रामिण भागात या विषयी भिती आणि चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन आणि आऱोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त खबरदारी घेणे, स्वच्छता पाळणे अशी काळजी घेणे हात यावरील उपाय असणार आहे. सध्या विशषतज्ञ यावर बारिक नजर ठेवून आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील या आजाराच्या घटना सर्व राज्यासाठीच धोक्याची घंटा आहे. वेळीच जागरूक राहून आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून उपाययोजना अंमलात आणणे फायद्याचे ठरणारे आहे. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!